Rahul Shewale : 'त्या' आक्षेपार्ह फोटो अन् व्हिडिओच्या विरोधात खासदार शेवाळेंची पत्नी मैदानात

rahul shewale latest news |केंद्रीय महिला आयोगाकडे देखील लवकरच तक्रार दाखल करणार आहे.
rahul shewale,  Kamini Shewale
rahul shewale, Kamini Shewalesarkarnama

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर खासदार राहुल शेवाळे (rahul shewale) यांच्या आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओंची सध्या समाजमाध्यमांवर चर्चा आहे. याबाबत त्यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांनी पोलिसात धाव घेतली आहे. संबधित महिलेच्या विरोधात त्या सरसावल्या आहेत. (rahul shewale latest news)

"माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या मानसिक त्रासाला कारणीभूत असलेल्या या महिलेच्या विरोधात मी स्वतः केंद्रीय महिला आयोगाकडे देखील लवकरच तक्रार दाखल करणार आहे. आमचा न्यायव्यवस्था आणि पोलिसांवर विश्वास असून आम्हाला या प्रकरणात न्याय मिळेल, याची खात्री आहे," असे कामिनी शेवाळे यांनी सांगितले आहे.

सोशल मिडीयाच्या माध्यमातून आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ प्रसारित करून शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांची प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्याया महिलेच्याविरोधात गेल्या वर्षीच सायबर पोलिसाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

rahul shewale,  Kamini Shewale
Aurangabad : बंडखोरीनंतरही ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचे सत्तार, सिरसाट, भुमरेंचे वर्चस्व कायम

"अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशाने या महिलेविरोधात साकीनाका पोलिसांकडून एफआयआर नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे. "ही महिला गेल्या वर्षभरापासून मला आणि माझ्या मुलांना जीवे मारण्याची धमकी देत आहे. याविरोधात मी सर्व पुराव्यानिशी स्वतः गोवंडी पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीवरून या महीलेविरोधात एफ आय आर दाखल करण्यात आली आहे. या महिलेकडून मला आणि माझ्या कुटुंबीयांना होणारा नाहक त्रास थांबवण्यासाठी पोलिसांकडून तातडीने कारवाई करण्यात यावी, यासाठी आम्ही राज्य मानवी हक्क आयोगाकडेही दाद मागितली आहे," असे कामिनी यांनी सांगितले.

साकीनाका पोलिस राजकीय दबाबामुळे तक्रार घेत नसल्याचा आरोप महिला आयोगाने केला आहे. तक्रार दाखल करण्याचे पत्र महिला आयोगाने पोलिसांना दिले होते. राहुल शेवाळे यांच्या विरोधात त्यांच्या ओळखीच्या एका महिलेने एप्रिल महिन्यात साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रार करुन तीन महिने उलटले आहेत, मात्र पोलिसांनी यााबाबत कुठलीच कारवाई केलेली नाही. यामुळे तक्रारदार महिलेने राज्य महिला आयोगात जाऊन याबाबत आपली व्यथा मांडली. त्या महिलेने आयोगाकडे याबाबत तक्रार केली आहे.

आयोगाच्या वतीने मंगळवारी साकीनाका पोलीस ठाण्याच्या अधिकाऱयास बोलावून एप्रिलमध्ये महिला तक्रार दाखल करते आणि त्यावर अद्याप कोणतीच कारवाई होत नाही याबाबत खेद व्यक्त करण्यात आला. पीडित महिलेच्या तक्रारीबाबत योग्य ती कार्यवाही करून अहवाल आयोगाला सादर करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in