woman warns minister of social justice dhananjay munde on facebook
woman warns minister of social justice dhananjay munde on facebook

रावण, दुर्योधनानेही नारीच्या इज्जतीवर हात टाकला अन् तेच त्यांच्या पतनाचं कारण ठरलं!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एका तरूणीने बलात्काराची तक्रार पोलिसांकडे केली आहे. यावरून मोठा गदारोळ सुरू आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एका तरूणीने बलात्काराची तक्रार पोलिसांकडे केली आहे. यावर धनंजय मुंडे यांनी खुलासा केला होता. तक्रारदार तरुणीच्या बहिणीशी माझे संबंध होते आणि मला तिच्यापासून दोन मुले आहे, असे मुंडेंनी स्पष्ट केले होते. मुंडेंना उद्देशून संबंधित महिलेने तिच्या फेसबुक अकाउंटवरुन रावण आणि दुर्योधनाचा दाखला देत इशारा दिल्याचे समोर आले आहे.  

तक्रारदार तरुणी ही मुंडे यांचे संबंध असलेल्या महिलेची बहीण आहे. या महिलेने फेसबुकवर नोव्हेंबरमध्ये अकाऊंट तयार केले आहे. त्यावर तिने दोन महिन्यांपूर्वी तिचा व धनंजय मुंडेंचा फोटो शेअर केला होता. याचबरोबर तिने फेसबुकवर धनंजय मुंडे यांचेच नाव लावले आहे.  तिने फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, रावण आणि दुर्योधनाने नारीच्या इज्जतीवर हात टाकला आणि तेच त्यांच्या पतनाचे कारण झाले. आताही तसेच होणार आहे. 

दुसऱ्या एका फेसबुक पोस्टमध्ये तिने म्हटले आहे की, भावांनो आपण एकत्र येऊन लढलो तरच समाजातून चुकीच्या गोष्टी करणारे आणि अशा गोष्टी यांना साफ करू शकू.

एका पोस्टमध्ये तर तिने भगवद्गगीतेचा दाखला दिला होता. तिने म्हटले होते की, गीतेत सांगितले आहे की, जेव्हा सत्याची असत्याशी लढाई होईल त्यावेळी सत्य एकटे उभे असेल. असत्याची मोठी फौज त्यावेळी मोठी असेल कारण असत्याच्या मागे मूर्खांची मोठी फौज असेल. 

त्यावेळी तिला मुंडे यांच्या समर्थकांनी अनेक प्रश्न केले होते. ती कोण आहे, कशासाठी हे करीत आहे, ती आमच्या नेत्याला का बदनाम करीत आहे, असे प्रश्न विचारण्यात आले होते. यावर तिने म्हटले होते की, मी कोण आहे, हे आणखी दोन दिवसांत कळेल. मै परळी आ रही हूँ. 

आता त्या महिलेने फेसबुकवर नवीन पोस्ट केली आहे. यात तिने म्हटले आहे की, सत्य स्वत:च सिद्घ होत असते. जय श्री राम. सीता प्रत्येक युगात अग्निपरीक्षा देत आली आहे. आता मात्र, ती अग्निपरीक्षा देणार नाही.  

तक्रारदार तिने तक्रारीत म्हटले  होते की, बहिणीच्या लग्नात 1997 मध्ये तिचा मुंडेंशी परिचय झाला होता. बहीण गर्भवती असताना 2006 मध्ये मी एकटीच घरी असताना मुंडे आले होता. ते रात्री घरी आले आणि त्यांनी माझ्यावर बलात्कार केला. अशा प्रकार दर दोन-तीन दिवसांची येऊन ते लैंगिक शोषण करीत होता. याचबरोबर त्यांनी याचा व्हिडीओही तयार केला होता. 

मुंडे नंतर वारंवार मला फोन करुन माझ्यावर प्रेम असल्याचे सांगत होते. मला गायिका बनायचे असेल तर चित्रपट क्षेत्रात त्याच्या खूप ओळखी असल्याचे त्यांनी सांगितले होते. बडे चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांना भेटून तुला लाँच करतो, असेही आश्वासन त्यांनी दिले होते. अशा प्रकारे ते माझ्याशी शारीरिक संबध ठेवत होता, असे त्या तरुणीने तक्रारीत म्हटले होते.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com