अमृता फडणवीसांना फेसबुकवर शिवीगाळ करणाऱ्या महिलेला अटक; 'आयपी अ‍ॅड्रेस' तपासल्यावर...

Amruta Fadnavis : ही महिला ठाण्यातील रहिवासी असल्याचं समजले आहे.
 Amruta Fadnavis Latest News
Amruta Fadnavis Latest NewsSarkarnama

मुंबई : भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या एका महिलेला अटक करण्यात आली आहे. या महिलेने फेसबुकवर आपले बनावट अकाऊंट तयार करत अमृता यांना आक्षेपार्ह शब्दात शिवीगाळ केली होती. याप्रकरणी सायबर पोलिसांनी ठाण्यातून संबंधित महिलेला अटक केली आहे. (Amruta Fadnavis Latest News)

 Amruta Fadnavis Latest News
केजरीवालांना गुजरात पोलिसांनी ऑटोतून जाण्यास रोखल्याने रंगला हाय व्होल्टेज ड्रामा; व्हिडिओ व्हायरलं...

अमृता फडणवीस या सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांनी ७ सप्टेंबरला आपल्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट टाकली होती. त्या पोस्टवर एका फेसबुक युजरने आक्षेपार्ह भाषेच कमेंट करत शिवीगाळ केली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर ही पोस्ट काढून टाकण्यात आली. मात्र अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला होता. पोलिसांनी तपास सुरु केला होता. यामध्ये संबंधित एका महिलेने आपली ओळख लपवण्यासाठी गणेश कपूर या नावाने अकाऊंट तयार केले होते. मात्र पोलीस तपासात आयपी अ‍ॅड्रेस आणि मोबाइल एका महिलेच्या नावावर असल्याचं उघड झालं असून ही महिला ठाण्यातील रहिवासी असल्याचं समजते. या प्रकरणी रात्रीच तिला अटक कण्यात आली आहे. या महिलेने याआधीही अनेकदा अशा भाषेत कमेंट केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

 Amruta Fadnavis Latest News
स्वत: नांगुर ओढला, दावं घेऊन कुळव चालवलायं; मुख्यमंत्र्यांच्या काबाडकष्टाचं शहाजीबापूंनी केलं कौतुक

दरम्यान, अमृता फडणवीस या सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्या आपलं मत व्यक्त करत असतात. त्यावर अनेकदा त्यांना ट्रोल केलं जात. मात्र त्या त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र संबंधित महिलेने त्यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात शिवीगाळ केल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com