अविनाश जाधवांसह मनसे पदाधिकारी पोलिसांच्या रडारवर : राज ठाकरेंची शिवतीर्थावर खलबतं

Raj Thackeray | MNS | : राज ठाकरे काय भूमिका घेणार?
Avinash Jadhav | Raj Thackeray
Avinash Jadhav | Raj Thackeray Sarkarnama

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी राज्य सरकारला ४ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर मात्र भोंग्याविरुद्ध आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मनेसेचे (MNS) अनेक नेते आणि पदाधिकारी पोलिसांच्या रडारवर आले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून पोलिसांकडून मनसे पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक नोटीस दिली जात आहे.

मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांना ठाणे पोलिसांनी १४९ कलमांतर्ग नोटीस बजावली आहे. तसेच आज उद्या सकाळी ११ वाजता ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात २५ ऑगस्ट २०१६ मध्ये दाखल एका गुन्ह्याप्रकरणी त्यांना बोलाविण्यात आले आहे. याशिवाय मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे यांच्यासह खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरुर तालुक्यातील ५० मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेकडुन प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे.

Avinash Jadhav | Raj Thackeray
हे कोल्हापूर आहे! मुस्लिम बांधवांनी शिवजयंती सोहळ्यात सोडला अखेरचा रोजा

मनसेची आज शिवतीर्थावर महत्वाची बैठक

एका बाजूला मनसेच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावली जात आहे. त्याचवेळी भोंग्यांबाबतची पुढची भूमिका ठरवण्यासाठी राज ठाकरे यांनी शिवतीर्थांवर आज निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे. नेमकी पक्षाची भूमिका काय असेल ते पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली असल्याचे सांगण्यात येतं आहे. राज ठाकरेंच्या निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीला निवडक पदाधिकारी आणि नेते उपस्थित असणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in