शिंदे-फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंना शुभेच्छा; पण 'पक्षप्रमुख' पदाचा उल्लेख टाळला

Maharashtar Politics| Shivsena माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज (27जुलै) 62 वा वाढदिवस आहे.
 Uddhav Thackeray
Uddhav Thackeray sarkarnama

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज (27जुलै) 62 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंमत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीही उद्धव ठाकरे यांना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष बाब म्हणजे या पोस्टमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख केवळ माजी मुख्यमंत्री असा केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख करणं शिंदे आणि फडणवीस या दोघांनीही टाळलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

 Uddhav Thackeray
मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यात शिवसेनेचे विघ्न?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ट्विट

''महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना....''

देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट

माजी मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा! मी त्यांना निरोगी जीवन आणि दीर्घायुष्य चिंतितो!

कोरोना महामारीच्या दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मोठ्या संख्येने शिवसैनिक मातोश्रीवर दाखल होत आहेत. शिवसैनिकांच्या प्रेमापोटी उद्धव ठाकरे सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत शुभेच्छांचा स्वीकार करतील आहेत. मात्र फक्त शुभेच्छा द्या, हारतुरे नको, पुष्पगुच्छ आणि फोटोफ्रेम्स नको, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं आहे. राज्यातील सत्तापालटानंतर शिंदे गटाला दिवसेंदिवसं पाठिंबा वाढला आहेत. पण आज राज्यभरात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ अनेक शिवसैनिक त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून शुभेच्छा देताना दिसत आहेत. नाशिक, अमरावती, पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी शिवसैनिकांकडून उद्धव ठाकरेंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in