Winter Session : 'निर्लज्ज सरकारचा निर्लज्जपणा' : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी!

Jayant Patil : बॅनर घेऊन विरोधक आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर ठाण मांडले.
Jayant Pati Ncp
Jayant Pati Ncp Sarkarnama

Winter Session News : विधानसभा अध्यक्षांना उद्देशून निर्लज्ज असा शब्द वापरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना नागपूरचे हिवाळी अधिवेशन (Winter session) संपेपर्यंत म्हणजेच, येत्या ३० डिसेंबरपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी हा ठराव मांडला. यावर आता विरोधक आक्रमक झाले आहेत. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून विरोधकांनी सरकारविरोधात बॅनरबाजी करत आणि जोरदार घोषणाबाजीही केली.

Jayant Pati Ncp
NCP News; नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांना मोक्का लावा!

विरोधकांनी एकत्र येत विधानसभेच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात निदर्शने केली. 'निर्लज्ज सरकारचा निर्लज्जपणा," असं लिहलेल्या पाट्या आणि बॅनरघेऊन विरोधक आमदार विधानसभेच्या पायऱ्यांवर ठाण मांडले. यावेळी विरोधीपक्ष नेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, अमोल मिटकरी, चेतन तुपे व इतर आमदार ही उपस्थित होते. त्यांनी यावेळी घोषणाबाजी केली.

Jayant Pati Ncp
Beed News : मोदींनी भूमिपुजन केलेल्या शिवस्मारकाचे काम पुढे कधी सरकणार..

जयंत पाटीलांची प्रतिक्रिया :

दरम्यान जयंत पाटील यांनी निलंबनाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. पाटील म्हणाले, सत्तारुढ पक्षाला प्रश्न विचारून अडचणीत आणण्याची संधी असताना आम्हाला बोलण्याची संधी नाकारण्यात आली. विरोधी पक्षाचा (opposition party) आवाज दाबवण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे सरकारने निर्लज्जपणा करू नये, असे मी बोललो. पण सरकारला आज कोणाचा तरी विषय टाळायचा होता. यासाठीच माझे निलंबन करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com