Maharashtra Politics : 2024 मध्ये तुम्हीच मुख्यमंत्री होणार का? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं...

Eknath Shinde : ''लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं...''
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Shivsena : आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी आतापासूनच सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात वेगाने राजकीय घडामोडी घडत असून शिंदे आणि ठाकरे यांच्यात आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत.

2024 ला आगामी निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप युती म्हणून निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचे अनेकवेळा भाजप आणि शिंदेकडून सांगण्यात आले. मात्र, मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.

Eknath Shinde
Congress Constitution Amendments : काँग्रेसच्या संविधानात मोठे बदल : पक्षांतर्गत आरक्षण होणार लागू !

असे असतानाच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबबात भाष्य केलं. एका वृत्तवाहीनीच्या मुलाखतीत बोलताना त्यांना 2024 मध्येही तुम्हीच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असणार का? असा प्रश्न विचारण्यात आला.

यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, ''आता कुणाला मुख्यमंत्री करायचं हे जनतेच्या हातात असतं. आम्ही काम करत आहोत. या पुढेही आम्ही काम करत राहू'', असं म्हणत त्यांनी या प्रश्नावर थेट उत्तर देणं टाळलं.

Eknath Shinde
By Election : चिंचवडची पोटनिवडणूक मुद्द्यांवरून गुद्यावर; आता भाजप पदाधिकाऱ्याच्या कुटुंबाला मारहाण

ते पुढे म्हणाले, ''कुणाला मुख्यमंत्री करायचं आणि कुणाला मुख्यमंत्री पदावरून हटवायचं. हे सर्व जनताच ठरवत असते. आम्ही दिवस-रात्र एक करून काम करत आहोत. राज्यात मोठ-मोठे प्रकल्प उभारण्याचे काम आम्ही करत आहोत. या माध्यमातून आम्ही प्रत्येक क्षेत्राचा विकास करू इच्छित आहोत. देशाच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे'', असं ते यावेळी म्हणाले.

Eknath Shinde
Fadanvis : दोन-अडीच महिन्यात बहुतेक त्यांनी अख्खा महाराष्ट्र बदलून टाकला असावा !

तसेच शिवसेना आणि पक्षचिन्ह त्यांना मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, ''आम्हाला निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह दिलं. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं. त्यांच्या संपत्तीवर आम्ही दावा केलेला नाही आणि करणारही नाही. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांवर चालत आहोत'', असं शिंदे यावेळी म्हणाले.

''मी मुख्यमंत्री आहे, सगळ्या गोष्टींची खबर ठेवतो. आम्ही त्यांना (उद्धव ठाकरे यांना) जवळून पाहिलं आहे'', असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर टोला लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com