Shivsena News: बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्र अनावरण सोहळ्याला उद्धव ठाकरे जाणार का?

Uddhav Thackeray : तैलचित्राच्या अनावरणावरून राजकारण तापले
Balasaheb Thackeray, Uddhav Thackeray
Balasaheb Thackeray, Uddhav ThackeraySarkarnama

Balasaheb Thackeray's Jayanti: हिंदूह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उद्या (ता.२३) रोजी जयंती आहे. या निमित्ताने विधीमंडळात लावण्यात येणाऱ्या त्यांच्या तैलचित्राच्या अनावरणावरून सध्या चांगलेच राजकारण तापले आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर बाळासाहेब ठाकरे यांच्याच पुत्राचे म्हणजे उद्धव ठाकरे यांचे (Uddhav Thackeray) नाव नसल्यामुळे राजकारण तापलं आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे विधानभवनामध्ये उद्या (ता.२३) अनावरण होणार आहे. तैलचित्र अनावरण सोहळा हा उद्या (ता.२३) सायंकाळी सहा वाजता पार पडणार आहे. मात्र, या सोहळ्याला बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Balasaheb Thackeray, Uddhav Thackeray
Politics : कट्टर राजकीय विरोधक सत्यजीत तांबे अन् शुभांगी पाटील आले आमने-सामने; पण...

तैलचित्र अनावरण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर उद्धव ठाकरे यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे याबाबत शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर या कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये उद्धव ठाकरे यांचे नाव नसल्यामुळे राजकारणही चांगलेच तापले आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते होणार आहे. या तैलचित्र अनावरण सोहळ्यासाठी ठाकरे कुटूंबातील सदस्यांना निमंत्रण विधानसभा अध्यक्षांनी दिलं आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला कोण कोण उपस्थित राहणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

तसेच छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे सकाळी 7 वाजल्यापासून ठाकरे गटासह इतर पक्षाचे नेते बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. यावेळी शिंदे गटातील नेते अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहणार का? याकडे लक्ष लागले आहे.

Balasaheb Thackeray, Uddhav Thackeray
Aditya Thackeray : माझे आजोबाही म्हणत असतील, गद्दारांच्या हस्ते माझ्या तैलचित्राचे अनावरण..

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुंबईसह राज्यात विविध कार्यक्रमांचे ठाकरे गटाकडून आयोजन करण्यात आहे. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे उद्या रिंगल येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी संध्याकाळी 5 वाजता हजर राहणार आहेत. यावेळी ठाकरे गटाकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. तसेच संध्याकाळी 6.30 वाजता उद्धव ठाकरे माटुंगा येथे मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in