Sanjay Raut on Devendra Fadanvis: न्यायालयात इतर निर्णय मॅनेज करता, मग मराठा आरक्षण... राऊतांनी फडणवीसांना डिवचलं...

Maratha Reservation | सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची मराठा आरक्षणासंदर्भात पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. त्यामुळे राज्य सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे.
Sanjay Raut- Devendra Fadanvis
Sanjay Raut- Devendra FadanvisSarkarnama

Sanjay Raut Criticized Devendra Fadanvis : सध्याचे उपमुख्यमंत्री सध्याचे विरोधी पक्षात असताना सांगत होते आमच्या हातात सत्ता द्या, आम्ही सत्तेत आल्यावर दोन दिवसात मराठा आरक्षण देतो. न्यायालयात विषय आहे हा विषय नंतर, आम्ही सगळेच वाट पाहत होतो, न्यायालयात काय निर्णय होतो. जर सगळे निकाल न्यायालयात, निवडणूक आयोगात मेनेज केले जातात, तर हा महाराष्ट्राच्या समाजासाठी इतका महत्त्वाचा निर्णय आपल्या मनाप्रमाणे का मिळू शकला नाही, असा सवाल करत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

Sanjay Raut- Devendra Fadanvis
Maratha Reservation : मराठा आरक्षणाची याचिका फेटाळल्यानंतर मुख्यमंत्री ‘अ‍ॅक्शन मोड’ मध्ये; बोलावली तातडीची बैठक

सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारची मराठा आरक्षणासंदर्भात पुनर्विचार याचिका फेटाळल्याने संजय राऊत यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी आज सकाळीच माध्यमांशी बोलत होते. पण आमच्या हातात सत्ता द्या लगेच आरक्षण देतो, मग धनगर समाज असेल मराठा असेल अन्य समाज असतील आता काय झालं, आता तुमच्या हातात नऊ महिन्यापासून सत्ता आहे. सीमाप्रश्नापासून मराठा आरक्षणापर्यंत एकही निकाल लागत नाही, सगळे प्रश्न आहेत मग तुमचे पाऊल का पडत नाही त्या वर तुमचे दातखिळी बसली का, असाही प्रश संजय राऊत यांनी उपस्थित केला आहेत.

Sanjay Raut- Devendra Fadanvis
Breaking News : राहुल गांधी,योगी आदित्यनाथ,अजित पवार यांच्या अकाऊंटवरुन ब्लू टिक हटवली; काय आहे कारण?

इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून शिवसेना आणि धनुष्यबाणा आमच्या हातातून काढून घेण्यासाठी तुमच्या हालचालीबरोबर असतात.सर्वोच्च न्यायालयातून सत्ता संघर्षाबाबत हवे ते निकाल तुम्ही बरोबर मिळवता मग मराठा आरक्षणाबाबत तुम्ही कुठे कमी पडलात. हे तुम्ही लोकांसमोर येऊन सांगायला पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे. (Maratha Reservation)

संजय राऊतांनी सकाळचे अभंग बंद करावेत,असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले होते, असा प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले की, तुम्हीही आमच्या अभंगात सामील व्हा, पण हा तुम्ही कीर्तन करताय का, अभंगाची तुम्ही चेष्टा करू नका. अभंग ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा आहे. पण तुमच्यात ताकद असेल तर अभंगला उत्तर द्या टाळ तरी कुटून दाखवा तुम्ही नुसतं चिपळ्या वाजवताय, बेईमानीने तुमच्या पोटात गोळा आलाय आमच्या अभंगामुळे आमच्या अभंगामुळे वातावरणात परिवर्तन होताना दिसते आमचा अभंग हा अन्यायाविरुद्ध आहे, असं उत्तरही संजय राऊतांनी दिलंय..

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com