भाजप-मनसे युती होणार? फडणवीस, तावडेंनंतर आज बावनकुळे राज ठाकरेंना भेटणार

Raj Thackeray|Devendra fadnavis | राज ठाकरे यांनी सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली
Devendra Fadanvis| Raj Thackeray
Devendra Fadanvis| Raj Thackeraysarkarnama

मुंबई : राज्यात दीड महिन्यापूर्वी सत्तांतर झाले. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन राजकीय समीकरणे समोर येत असल्याचे चित्र आहे. त्यानंतर काल (२९ ऑगस्ट) सकाळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सागर बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांची भेट घेतली. या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. या भेटीनंतर राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा-मनसे युतीचे संकेत दिसू लागले आहेत.

मागील दोन दिवसांपासून मनसे आणि भाजपा नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याचे दिसत आहेत. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनीदेखील काल 'शिवतीर्थ'वर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आज (३० ऑगस्ट) थेट भाजपाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील राज ठाकरेंची भेट घेणार असल्याची माहिती आहे.

भाजप नेते आणि राज ठाकरे यांच्यातील वाढत्या भेटीगाठी भाजपा-मनसेच्या युतीचे संकेत मानले जात आहेत. भाजप-मनसे नेत्यांच्या भेटीगाठींमध्ये आगामी महापालिका निवडणुकीला सामोरं जातानाच्या रणनितीवर चर्चा करण्यात आल्याचीही माहिती आहे. दरम्यान, राज ठाकरे आणि फडणवीसांच्या कालच्या भेटीबाबत मोठी गुप्तता पाळण्यात आली होती. त्यांच्या वृत्त मात्र दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून फेटाळण्यात आलं आहे. पण जसजसं निवडणूक जवळ येईल तसं चित्र अधिक स्पष्ट होईल असं सांगितलं जात आहे.

राज-फडणवीस गुप्त भेट
शिवसेनेतील फुटीमुळे राज्यात अस्थिर राजकीय वातावरणाचा मुंबई महापालिका निवडणुकीत पक्षाला कसा फायदा होईल, यासाठी मनसेकडून प्रयत्न सुरु असल्याचं दिसत आहे. तसेच, राज ठाकरे यांच्या वक्तृत्व शैलीमुळे ते हे सर्व मुद्दे लोकांसमोर प्रभावीपणे मांडतात. याचा फायदा कुठेतरी भाजपला मिळू शकतो. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप एकत्र येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यादृष्टीने राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावरील भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in