Shivsena Bhavan| शिंदे गट प्रतिशिवसेना भवन उभारणार? अखेर उदय सामंतांनीच सांगितलं...

Shivsena Bhavan|CM Eknath Shinde| एकनाथ शिंदे आता प्रति शिवसेनाच उभारण्याकडे भर देत आहेत, असं चित्र निर्माण झालं आहे.
Shivsena Bhavan| Uday Samant
Shivsena Bhavan| Uday Samant

मुंबई : शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दादरमध्ये प्रति शिवसेना (Shivsena) भवन उभारणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत मंत्री उदय सामंत (uday samant) यांनी ट्वीट करत एक खुलासा केला आहे. मुंबईत आम्ही प्रति शिवसेना भवन नाही तर, जनसंपर्कासाठी कार्यालय बांधणार असल्याचे स्पष्टीकरण सामंतांनी दिले आहे.

Shivsena Bhavan| Uday Samant
वसंतदादा पाटील यांच्या नातीचे डॉ. मधू पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

“मुंबई दादर येथे प्रति शिवसेना भवन मा. एकनाथजी शिंदे करत आहेत, हा गैरसमज पसरवला जात आहे. मा. मुख्यमंत्री महोदयांना सर्वसामान्य जनतेला भेटता याव ह्यासाठी मध्यवर्ती कार्यालय असावे आमचा प्रयत्न आहे. शिवसेना भवनबद्दल आम्हाला कालही आदर होता उद्याही राहील”, असं ट्विट उदय सामंत यांनी केलं आहे.

तर एकनाथ शिंदे यांच्या गटात राज्यातील आमदार, खासदारांसह शिवसेनेचे अनेक नगरसेवक, शाखाप्रमुख, पदाधिकारीही शिंदे गटात सामील होत आहे. त्यामुळे शिंदे गटात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी हक्काचं ठिकाण असावं म्हणून दादर, ठाण्यात शिंदे गटाचे मध्यवर्ती कार्यालय उभारण्यात येणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. या कार्यालयात पक्षाचे कार्यकर्ते, शाखाप्रमुख, आमदार, खासदार, नगरसेवकांसाठी हे कार्यालय उभारण्यात येणार आहे. त्यातून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी होतील. या कार्यालयातून राज्यभरात पक्षाची ध्येय धोरणं, कार्यक्रम आखले जातील, अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

- सदा सरवणकरांनी दिली होती प्रति शिवसेना भवनाची माहिती

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी याबाबत माहिती दिली होती. ''बाळासाहेबांनी उभारलेलं शिवसेना भवन जे दादरमध्ये आहे, त्याच दादरमध्ये येत्या महिन्याभरात प्रति शिवसेना भवन उभारले जाणार आहे. तसेच प्रत्येक वार्डा वार्डात शिवसेनेच्या शाखा आहेत तशाच शाखा शिंदे गटाकडून उभारल्या जाणार आहेत. त्याचबरोबर शाखाप्रमुख विभाग प्रमुख आणि इतर पदाधिकारी देखील नियुक्त केले जाणार असल्याचे सदा सरवणकर यांनी सांगितले आहे.

Shivsena Bhavan| Uday Samant
मातोश्रीला शिंदे गटाचे नवे आव्हान; दादरमध्ये उभारणार प्रति शिवसेना भवन

शिंदे गटात इन्कमिंग सुरू आहे. आता शिंदे गटाच लक्ष मुंबई महानगरपालिकेवर आहे. त्यासाठीच प्रति शिवसेना भवन, प्रति शाखा महिन्याभरात उभारण्यात येणार आहे. एवढ्यावरच न थांबता मुंबईतील शिवसेनेचे 40 ते 45 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून शिंदे गटात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. असंही सदा सरवणकर यांनी सांगितले. त्यामुळे एकनाथ शिंदे आता प्रति शिवसेनाच उभारण्याकडे भर देत आहेत, अस चित्र निर्माण झालं आहे. पण त्यात त्यांना किती यश येतं हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com