Bmc Election News: मुंबई महापालिकेची निवडणूक 'मविआ' एकत्र लढणार की स्वतंत्र?; महत्वाची माहिती आली समोर

Bmc Election Dispute in MahaVikas Aghadi: मुंबई महापालिका निवडणुकीवरून महाविकास आघाडीत संभ्रम
Maha Vikas Aghadi
Maha Vikas AghadiSarkarnama

Mumbai : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाच्या हालचाली वाढल्या आहेत. राज्यात अनेक नेत्यांच्या भेटीगाठी देखील वाढल्याचे चित्र आहे. याबरोबरच मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने नेते कामाला लागले आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र लढणार, याबाबत सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

मुंबई महापालिकेची निवडणूक स्वतंत्र लढण्याची ठाकरे गटातील काही वरिष्ठ नेत्यांची वैयक्तिक भूमिका असल्याची माहिती सूत्रांकडून समजती आहे. मात्र, मुंबई महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र लढणार? याबाबतीत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

Maha Vikas Aghadi
Maval Loksabha News: राष्ट्रवादीचा मावळ लोकसभेवर दावा; ठाकरे गट तो मान्य करणार का ?

काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्यांनी ही निवडणूक स्वतंत्र लढण्यासंदर्भात भाष्य केलं होतं. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात नेमकं काय सुरू आहे? याबद्दलचा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.

यातच मुंबईत महापालिकेची निवडणूक आघाडी एकत्र लढली तर ठाकरे गटाला फटका बसू शकतो, अशा भावना ठाकरे गटातील काही नेत्यांच्या असल्याने नेमकं महाविकास आघाडीत चाललंय काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Maha Vikas Aghadi
Shirur LokSabha News: शिरूर लोकसभेवर विलास लांडेंनी ठोकला दावा; अमोल कोल्हेंच्या मनातलं कळेना?

दरम्यान, महाविकास आघाडीची बैठक पार पडल्यानंतरच याबाबतचं चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सध्या तरी मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढवायची की नाही याबाबत संभ्रम असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेते यावर काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in