ICICI-Videocon Loan Case : कोचर दाम्पत्याला दिलासा मिळणार का? सोमवारी होणार फैसला

ICICI-Videocon Loan Case : चंदा कोचर आणि दीपक कोचर यांच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात युक्तिवाद पूर्ण
Chanda Kochhar
Chanda Kochhar Sarkarnama

ICICI-Videocon Loan Case : आयसीआयसीआय बँक व्हिडिओकॉन लोन घोटाळा प्रकरणी चंदा कोचर आणि दीपक कोचर यांच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात युक्तिवाद पूर्ण झाला आहे. यावरील निर्णय हायकोर्टाने राखून ठेवला असून सोमवारी याबाबतचा निर्णय न्यायालय देणार आहे. त्यामुळे चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना दिलासा मिळणार की नाही, याबाबत आता सोमवारी स्पष्ट होणार आहे.

आयसीआयसीआय बँकमध्ये लोन घोटाळा प्रकरणी दीपक कोचर, चंदा कोचर, आणि वेणूगोपाल धूत यांना मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. या प्रकरणाच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात आज युक्तिवाद पूर्ण झाला. आता याबाबतचा निर्णय न्यायालय सोमवारी देणार आहे.

Chanda Kochhar
महापुरुषांची मापे काढायची आपली लायकी आहेत का; सर्वपक्षीय वाचाळवीरांना जाणकरांचा सवाल !

आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉनला नियम धाब्यावर बसवून कर्ज दिल्याचा आरोप चंदा कोचर (Chanda Kochhar) आणि दीपक कोचर (Deepak Kochhar) यांच्यावर आहे. कंपन्याना कर्ज वाटप करताना अनियमितता झाल्याच्या अरोपावरून कोचर यांना अटक करण्यात आलेले आहे.

तर सीबीआयने केलेली अटकेची कारवाई बेदायदेशीर असल्याचा दावा करत जेलमधून तात्काळ सुटकेची मागणी कोचर दाम्पत्यानी केलीय. तपासात वारंवार सहकार्य करून देखील सीबीआयने जाणूनबुजून आपल्याला अटक केल्याचा आरोपही कोचर दाम्पत्याने कोर्टात केला.

Chanda Kochhar
Dattatray Bharane : मीही पवारांचा पट्ट्या....: दत्तात्रेय भरणेंनी हर्षवर्धन पाटलांना ललकारले

मात्र, सीबाआयने हे आरोप फेटाळत कोचर दाम्पत्य चौकशीत काहीच सहकार्य करत नसल्याचा दावा केला आहे. दरम्यान, कोचर यांच्या मुलाचे येत्या १५ जानेवारीला लग्न असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे तो पर्यंत त्यांना जामीन मिळणार की नाही, हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

नेमकी काय आहे प्रकरण?

२००९ ते २०११ मध्ये बँकेने व्हिडिओकॉन (Videocon) समूहाला १ हजार ७३५ कोटींचे कर्ज दिले आहे. मात्र हा आर्थिक व्यवहार करताना गैरप्रकार करण्यात आल्याचा आरोप कोचर यांच्यावर आहे. याच पार्श्वभूमीवर सीबीआयने (CBI) तपास सुरू केला आहे. तर याप्रकरणामध्ये चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडिओकॉनचे वेणुगोपाल धूत यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केलेला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in