Hindu Jan Aakrosh Morcha : मुंबईच्या संरक्षणासाठी 'त्यांना' बाहेर काढू... नितेश राणे यांचा इशारा

Love Jihad and BJP : भाजप, शिंदे गटाकडून लव्ह जिहाद, धर्मांतरणविरोधात कायदा करण्याची मागणी
Hindu Jan Akrosh Morcha
Hindu Jan Akrosh MorchaSarkarnama

Hindu Jan Akrosh March : राज्यात लव्ह जिहाद (Love Jihad) आणि धर्मांतरविरोधात कायद लागू करण्यासाठी हिंदू (Hindu) संघटनांच्या वतीने ठिकठिकाणी मोर्चाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार आज मुंबईतही मार्चाचे आयोजन करण्यात आलं आहे.

या ‘हिंदू जनआक्रोश मोर्चात हिंदू संघटनांसह भाजप आणि शिंदे गटातील नेते आणि पदाधिकारी सहभागी झाले आहेत. त्यांनी लव्ह जिहाद,धर्मांतरणविरोधात कायदा राज्यासह देशात लागू करण्याची मागणी केली. तसेच मुंबईच्या संरक्षणासाठी कडक पाऊल उचण्याचे वक्तव्यही यावेळी करण्यात आली.

Hindu Jan Akrosh Morcha
Politics : शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडतोय? खडसेंनी सांगितलं कारण

‘सकल हिंदू समाजा’च्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. दादार (प) येथील मैदानातून मोर्चाला सुरुवात झाली. आता हा मोर्चा कामगार मैदानावर धडकला आहे. या मोर्चाला आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. असे असतानाही शिवसेनेचे (ठाकरे गट) आणि मनसेचे नेते मोर्चात सहभागी झाले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या मोर्चात नितेश राणे, अशिष शेलार (Ashish Shelar), प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, चित्रा वाघ आदी नेते आणि पदाधिकारी सहभागी झाले आहेत. मार्चात सहभगी हिंदू संघटनांसह भाजप आणि शिंदे गटाच्या वतीने ल जिहाद आणि धर्मांतरण विरोधात कायदा संपूर्ण राज्यासह देशात लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Hindu Jan Akrosh Morcha
Aurangabad Teachers Constituency : राणा पाटलांची यशस्वी शिष्टाई : क्षीरसागरांची ताकद भाजपच्या किरण पाटलांच्या पाठीशी

यावेळी नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आपल्या स्टाईलमध्ये थेट बोलून खळबळ उडवून दिली आहे. नितेश राणे म्हणाले, "जिहादी विचारांच्या लोकांनी आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. त्या पार्श्वभूमिवर मुंबईतील हिंदू जागा झाला असून त्यांनी जशाच तसं उत्तर दिलं आहे.मुंबईत राहणारे रोहिंग्या, बांग्लादेशी आहेत, त्यांनी एक लक्षात घ्यावं की गरज पडल्यास मुंबईच्या संरक्षणासाठी जिहादी विचारांच्या लोकांना मुंबईतून बाहेर काढण्याची आमच्यात ताकद आहे." ही धमकी वजा इशारा असल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

प्रवीण दरेकर (Pravin Darekar) म्हणाले, "हिंदू मुलींना फुस लावून मोठ्या प्रमाणात धर्मांतर केलं जातंय. त्यामुळं धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्याची गरज निर्माण झाली आहे." तर किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी थेट मविआ सरकारवर टीका केली आहे. सोमय्या म्हणाले, "तत्कालीन मविआ सरकारच्या ३२ महिन्यांच्या कारभारामुळे लव्ह जिहात उफाळला आहे, असं म्हणत सोमय्या यांनी ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर निशाना साधला आहे."

Hindu Jan Akrosh Morcha
Ajit Pawar : लव जिहादच्या नावाखाली जाती-जातीत विष पेरण्याचं काम : अजित पवारांचा हल्लाबोल!

चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी मागणी केलेले कायदे देशात लवकरच लागू होण्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला. वाघ म्हणाल्या, "देशात हिंदूविरोधी होणाऱ्या कारवाया बरोबर नाहीत.मोर्चाच्या माध्यमातून होणाऱ्या मागण्यांना समर्थन आहे.अनेक ठिकाणी १८ वर्षे किंवा त्या खालील हिंदु मुलींचे बळजबरीनं धर्मांतर केलं जातंय. हिंदू मुलींच्या संरक्षणासाठी उत्तर प्रदेशच्या धर्तीवर धर्मांतर विरोधी कायद्याची गरज आहे. केंद्रात आणि राज्यात आमचंच सरकार आहे. त्यामुळे कायदा नक्की लागू होईल."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com