दसरा मेळाव्यापूर्वी सिद्धेश रामदास कदम यांची युवा सेनेतून हकालपट्टी होणार?

Shivsena|Yuvasena| Siddhesh Ramdas Kadam| सिद्धेश कदम हे बंडखोर आमदार योगेश कदम यांचे बंधू तर रामदास कदम यांचे ते चिरंजीव आहेत.
Siddhesh Ramdas Kadam|
Siddhesh Ramdas Kadam|Sarkarnama

Dasara Melava| Yuvasena| मुंबई : शिवसेनेच्या युवासेनेच्या बैठकीत चांगलाच वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. सिद्धेश रामदास कदम हे युवासेनेच्या पदावर अजून का आहेत? अशा शब्दांत विभाग प्रमुख सुधाकर सुर्वे आणि आमदार विलास पोतनीस यांनी केलेल्या प्रश्नांमुळे बैठकीतलं वातावरण तापलं होतं. विभाग प्रमुखांंनी युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांना जाब विचारत दोघांनाही चांगलचं झापलं. त्यामुळे आता सिद्धेश कदम यांची दसरा मेळाव्याच्या आधीच शिवसेनेतून (Shivsena) हकालपट्टी होण्याची दाट शक्यता आहे.

तीन महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून फारकत घेत ४० आमदार आणि काही खासदारासंंह भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर काही दिवसांतच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनीदेखील शिवसेनेला रामराम करत शिंदे गटाची वाट धरली. तेव्हापासून रामदास कदम सातत्याने शिवसेनेवर हल्ले करत आहेत. वादग्रस्त टीकांमुळे शिवसेना आणि कदम यांच्यातील संघर्षही तीव्र झाला आहे.

Siddhesh Ramdas Kadam|
Imtiaz Jalil : जिल्ह्यातील मंत्र्यांवर लक्ष ठेवण्याचे तुम्ही सोपवलेले काम प्रामाणिकपणे करणार..

त्यातच शिवसेना नेते अनिल देसाई आणि विनायक राऊत यांनीही याबाबत सरदेसाई आणि चव्हाण यांना जाब विचारला? यावर दोघांनीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारुन निर्णय घेऊ, असे उत्तर दिले. हे उत्तर एकूण उपस्थित विभागप्रमुख चांगलेच भडकले.

सिद्धेश कदम हे बंडखोर आमदार योगेश कदमांचे बंधू तर रामदास कदमांचे चिरंजीव आहेत. सिद्धेश कदम यांना अद्याप पदावर ठेवल्याने शिवसेनेचे इतर पदाधिकारी नाराज आहेत. सातत्याने तक्रार करून देखील सूरज चव्हाण यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला होता. त्यामुळे युवासेनेच्या बैठकीत सुर्वे आणि पोतनीसांनी वरुण सरदेसाई आणि सूरज चव्हाण यांच्यावर चांगलीच आगपाखड केली. त्यामुळे आता दसऱ्याच्या पुर्वसंध्येला सिद्धेश कदम यांची हकालपट्टी होणार असल्याचे मानले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com