मुख्यमंत्री शिंदेंचे निमंत्रण शिवसेनेचे आमदार स्वीकारणार का?

या स्नेह भोजनास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहाणार आहेत.
Eknath Shinde-Uddhav Thackeray
Eknath Shinde-Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने राज्यातील सर्वपक्षीय आमदारांसाठी आज (ता. १२ ऑगस्ट) रात्री मुंबईतील ताज हॉटेलमध्ये स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री शिंदे हे यावेळी उपस्थित राहणार आहेत. या स्नेह भोजनासाठी विरोधी पक्षाचे विशेषतः शिवसेनेचे (Shivsena) आमदार हजेरी लावणार का? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. (Will Shiv Sena MLAs accept Chief Minister Eknath Shinde's invitation?)

बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडली आहे. विधानसभेतील तब्बल ४० हून अधिक शिवसेनेच्या आमदारांनी शिंदे यांचे समर्थन केले आहे. तसेच, लोकसभेतील बारा खासदारही एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत, त्यामुळे सध्या शिवसेना अडचणीत आहे. त्यातच शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये मोठा कलगीतुरा रंगलेला आहे. त्यातून दोन्ही गटात प्रचंड कटुता आलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारचे हे निमंत्रण स्वीकारून शिवसेना आमदार स्नेह भोजनास उपस्थिती लावतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
राणा दाम्पत्याचा जामीन रद्द होणार? पुढील सुनावणी २२ ऑगस्टला

मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह बंडखोर १६ आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईचा मुद्दा, विधानसभा अध्यक्ष निवड व इतरही काही मुद्यांवर सध्या सर्वोच्च न्यायालयात वाद सुरू आहे. शिवसेनेचा ताबा, धनुष्यबाण चिन्ह यासंदर्भातही निवडणूक आयोगापुढे सुनावणी होणार आहे, त्यामुळे दोन्ही गटाकडून जोरदार खेचाखेची सुरू आहे. त्यामुळे शिंदे सरकारच्या स्नेह भोजनास विरोधी पक्ष हजेरी लावतात का हे पाहावे लागेल.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
तर... मी शहीद झालो असतो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं खळबळजनक वक्तव्य

हे स्नेहभोजन राज्य सरकारच्या राज शिष्टाचार विभागाकडून आयोजित करण्यात आले आहे. राज्यातील सर्वपक्षीय आमदारांना त्याचे निमंत्रण देण्यात आलेले आहे. या स्नेह भोजनास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित रहाणार आहेत. त्या विरोधी पक्ष विशेषतः शिवसेनेतील आमदार उपस्थित रहाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
Pankja Munde: पंकजाताई म्हणतात, मला तो `सुखद` अनुभव आलेला नाही!

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारचं पहिलं पावसाळी अधिवेशन ता. १७ ऑगस्टपासून मुंबईत सुरु होणार आहे. ते २५ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या अधिवेशनाचा कालावधी वाढवावा, अशी मागणी विरोधी पक्षांनी करण्यात आली आहे. या अधिवेशनाबाबत १६ तारखेला विरोधकांची रणनीती ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com