Thackeray-Shinde Politics: तर एकनाथ शिंदे राजीनामा देणार का? संजय राऊतांचा सवाल

Sanjay Raut News: बाबरी मशीद पाडण्यात शिवसेनेचा काहीही संबंध नव्हता, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता
Thackeray-Shinde Politics:
Thackeray-Shinde Politics:Sarkarnama

Sanjay Raut Criticized Shinde Group: भाजप नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, बाबरी मशीद पाडण्यात शिवसेनेचा काहीही संबंध नव्हता, असा दावा केला होता. सोमवारी (१० एप्रिल) एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला. त्यांच्या या दाव्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासह शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

"आता प्रश्न हाच आहे. शिवसेना (Shivsena) प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुंत्वाच्या विचाराचे आम्हीच पाईक आहोत असे बोलणारे सरकार जमा ४0 मिंधे काय करणार? काल याच बाळासाहेब विरोधकांच्या चड्डीची नाडी पकडून अयोध्येत जाऊन आले. साहेबांच्या अपमाना विरोधात कोण दांडका उचलणार? नालायक लेकाचे!गुलाम! असे ट्विट करत संजय राऊतांनी शिंदे गटावर टिकास्त्र डागलं आहे.

Thackeray-Shinde Politics:
Paras Accident News : महाजन व सत्तारांनी जखमींना दिला धीर, म्हणाले सरकार तुमच्या पाठीशी !

तसेच, हिंदूत्त्वासाठी आम्ही शिवसेना सोडली असं जे म्हणत असतात त्यांच्याकडून मला उत्तर हवे आहे. जर त्यांच्यात हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं. देणार का ते उत्तर, कारण ते भाजपचे गुलाम आहेत आणि गुलाम हा गुलाम असतो. कारण मिंधे तोंड उघडणार नाहीत हे भाजपला माहित आहे. भाजपने शिवसेनेचा वारंवार अपमान केला, बाळासाहेबांवरील भाजपच्या वक्तव्यावर शिंदेंनी बोलावं.पण मुख्यमंत्री शिंदे गुलाम आहेत, मी तर म्हणेन राजीनामे द्या, आहे का तुमच्यात हिंमत, असे आव्हानही त्यांनी दिले आहेत. हे सर्व पळपुटे आहेत. त्यांनी ही बाळासाहेबांवर मुद्दामहून केलेली चिखलफेक आहे. यांना शिवसेनेचं नाव घेण्याचा अधिकार नाही.बाळासाहेबांचा त्याग देशाला माहिती असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील ?

चंद्रकांत पाटील म्हणाले, ''बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा सहभाग नव्हता. बाबरी मशीद पाडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, बाबरी मशीद पाडली याची जबाबदारी मी घेतो. पण त्यावेळी अयोध्येत शिवसेना गेली होती का? की बाळासाहेब ठाकरे हे तेथे गेले होते?'', असे प्रश्नही यावेळी त्यांनी उपस्थित केले.

Thackeray-Shinde Politics:
Threat to the Chief Minister : 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उडवणार..' ; कंट्रोल रूमवर धमकीचा फोन, एकच खळबळ..

''बाबरी मशीद पाडण्यात आली, त्यावेळी शिवसेना तिथे गेली होती की बजरंग दल तेथे होतं? मग कारसेवक कोण होते? पण आता एवढं जनरलाईज करण्याची गरज नाही. कारण कारसेवक हे हिंदू होते. कारसेवक हे बजरंग दलाच्या नेतृत्वाखाली गेले होते.असं काही नव्हत की आम्ही बजरंग दलाचे नाही आणि शिवसेनेचे नाही, असं त्यांचं नव्हतं. कारण सगळ्यांनी नेतृत्व मान्य केलं होतं की, हे आपण करू शकतो आणि त्यांनी ते केलं'', असं पाटील म्हणाले.

''बाबरी मशीद पाडण्यात आली त्यावेळी आपण स्वत: व्यवस्थापना संदर्भातील कामासाठी अयोध्येत उपस्थित होतो. बाबरी मशीद ज्या वेळी पाडली ते शिवसैनिक नव्हतेच. कारण मला एक महिनाभर तेथे नेऊन ठेवलं होतं, असा दावाच चंद्रकांत पाटील यांनी केला होता. (Latest Maharashtra News)

Edited By-Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com