Sanjay Raut News : पोपटलाल'ला कायदेशीर नोटीस पाठवणार; संजय राऊतांचा इशारा कुणाला?

संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर 100 कोटींच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप केला.
Sanjay Raut News
Sanjay Raut News Sarkarnama

Sanjay Raut News : महाविकास आघाडीतील नेत्यांवर बेहिशोबी मालमत्ता, घोटाळ्यांचे आरोप केल्याने सोमय्या आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमधील वाद शिगेला पोहचला आहे. असे असतानाच आता खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधत त्यांना लवकरच कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचा इशारा दिला आहे. इतकेच नव्हे तर, राऊत यांनी ट्विट करत त्यांना 'पोपटलाल' म्हणत डिवचलंही आहे.

''भाजप नेते किरीट सोमय्या उर्फ ​​पोपटलाल माझ्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत आणि शिवसेना नेत्यांवर चिखलफेक करत आहेत. मी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे आणि पोपटलाल यांना लवकरच कायदेशीर नोटीस पाठवली जाईल. सत्याचा लवकरच विजय होईल. जे काही असेल ते. बाहेर येईल! जय महाराष्ट्र!" अशा शब्दांत संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना इशारा दिला आहे.

Sanjay Raut News
Pune News : मुंबईनंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका ईडीच्या रडारवर; वाचा, काय आहे प्रकरण?

किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला होता, त्यावर मुंबईच्या शिवडी कोर्टात सुनावणी सुरू आहे. गेल्या सुनावणीत संजय राऊत हजर न राहिल्यामुळे या न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते आणि आज 24 जानेवारी रोजी राऊत यांना शिवडी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते.

दोघांमधील वादाचे कारण काय?

संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर 100 कोटींच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप केला. हा आरोप खोटा असल्याचे सांगत मेधा सोमय्या यांनी राऊत यांच्यावर बदनामीचा दावा केला. किरीट आणि मेधा सोमय्या यांच्या म्हणण्यानुसार, 18 एप्रिल 2022 रोजी, संजय राऊत यांनी त्यांच्या सामनाच्या लेखात मेधा सोमय्या यांच्यावर मीरा-भाईंदरमध्ये 16 कोटी रुपयांच्या शौचालयाच्या बांधकामासाठी निविदा काढण्यासाठी राजकीय ताकद वापरत सुमारे चार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता.

Sanjay Raut News
BARTI News : 'बार्टी'च्या महासंचालकपदी सुनील वारे यांची नियुक्ती,गजभियेंची तडकाफडकी बदली

यानंतर किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यातील वाद खूप वाढला आणि या प्रकरणी मानहानीचा दावा दाखल करूनही संजय राऊत कधीही न्यायालयात हजर झाले नाहीत. त्यानंतर राऊत यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात आले. आज संजय राऊत यांनी या प्रकरणाबाबत ट्विट करत किरीट सोमय्या पोपटलाल अशा शब्दांत डिवचत त्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com