संभाजीराजे निवडणूकीच्या मैदानातून माघार घेणार की आव्हान देणार? आज होणार फैसला

Sambhajiraje Chhatrapati| rajysabha| राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून अपक्ष म्हणून निवडून जाऊ, असा संभाजीराजे छत्रपती यांनी मनसुबा होता.
Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje Chhatrapati

Sambhajiraje Chhatrapati latest news update

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून अपक्ष म्हणून निवडून जाऊ, असा संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी मनसुबा होता. पण काही अपक्ष आमदार सोडले तर महाविकास आघाडी आणि भाजप पैकी कोणीही संभाजीराजे यांच्या अपक्ष उमेदवारीला पाठिंबा देण्यास नकार दिला. त्यामुळे आता संभाजीराजे राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढणार किंवा नाही, हे आज स्पष्ट होणार आहे.संभाजीराजे छत्रपती शुक्रवारी सकाळी ११ वाजता मुंबईतील पत्रकारपरिषदेत यासंदर्भात खुलासा करणार आहेत.

Sambhajiraje Chhatrapati
उजनीचं पाणी पेटणार : जयंत पाटलांच्या घरासमोर शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन अपक्ष लढण्याच्या हेतूने मैदानात उतरलेले संभाजीराजे माघार घेण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. महाविकास आघाडी आणि भाजपने पाठिंबा देण्यास नकार दिल्याने संभाजी राजेंवर निवडणूक न लढवताच माघार घेण्याची वेळ आली आहे. इतकंच नाही तर राज्यसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी १० आमदारांचे अनुमोदनही संभाजीराजे छत्रपती यांना जमवता आले नाही. अर्ज भरताना अशी परिस्थिती असेल तर प्रत्यक्ष निवडणुकीतही संभाजीराजेंना किती पाठिंबा मिळेल, याबाबत साशंकताच आहे. त्यामुळे संभाजीराजेंनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेण्याचे निश्चित केल्याची चर्चा आहे.

कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षाने संभाजीराजेंना राज्यसभेसाठी पाठिंबा न दिल्याने मराठा संघटना आक्रमक झाल्या होत्या. संजय पवार यांनी शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी अर्ज दाखल केल्यानंतर संभाजीराजेंना महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळण्याच्या आशाही संपुष्टात आल्या. त्यामुळे गेल्या काही दिवसांत संभाजीराजेंनी मराठा संघटनांच्या समन्वयकांशी चर्चा केली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती आजच्या पत्रकार परिषदेत काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ते शिवसेनेला लक्ष्य करणार की अपक्ष म्हणून रिंगणात उतरून आव्हान निर्माण करणार, हे पाहावे लागेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com