राहूल गांधी पहिल्यांदाच येणार शिवाजी पार्कवर ?

मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी राहुल गांधींची (Rahul Gandhi) भेट घेऊन त्यांना शिवाजी पार्कवर येण्याचे निमंत्रण दिले आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama

मुंबई : काँग्रेस पक्षाचा (Congress) येत्या 28 डिसेंबरला स्थापना दिवस आहे. त्यानिमित्ताने या कार्यक्रमासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी शिवाजी पार्कवर (Shivaji Park) यावे यासाठी त्यांना निमंत्रण दिले असल्याचे मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी सांगितले. त्यांच्याशी ही भेट काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीनंतर त्यांच्या 12 तुघलक लेन येथील निवासस्थानी झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

Rahul Gandhi
राजीव गांधींनी माझ्याविरोधात सभा घेतली.. तरी मी जिंकलो : पवार रमले जुन्या आठवणीत!

भाई जगताप म्हणाले, मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा कार्यभार घेतल्यानंतर काँग्रेस स्थापना दिवसाचा कार्यक्रम शिवाजी पार्कवर करण्याचे जाहीर केले होते. यापूर्वी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शिवाजी पार्कवर येऊन गेले आहेत. मात्र, राहुल गांधी हे अद्याप येथे आलेले नाहीत. याबाबत त्यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी काँग्रेस स्थापना दिवशी शिवाजी पार्कवर येण्याचा नक्की प्रयत्न करू, अशी सकारात्मकता त्यांनी दाखवली असल्याचे त्यांनी सांगितले.

राहुल गांधी शिवाजी पार्कवर आल्यास ही पहिलीच वेळ असेल..

या आधी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हे शिवाजी पार्कवर येऊन गेले आहेत. मात्र, राहुल गांधी आतापर्यंत शिवाजी पार्कवर आलेले नाहीत. जगतापांच्या निमंत्रणाला स्वीकारत राहूल गांधी जर, आले तर, त्यांचा या ठिकाणी पहिलाच कार्यक्रम असेल.

Rahul Gandhi
अमृता फडणवीस यांनी सांगितले देवेंद्रजींच्या आवडीचे गाणे...

आगामी मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गांधी यांच्या सोबतच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे जगताप ‌सांगितले आहे. मात्र, मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जगताप यांची ही भेट महत्वाची मानली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com