अंधेरीतील विजयाचा जल्लोष साजरा करणार नाही; कारण... : ऋतुजा लटके

माझ्या मनात खंत आणि दुःख आहे.
Rituja Latke
Rituja LatkeSarkarnama

मुंबई : अंधेरी (Andheri) विधानसभा पोटनिवडणुकीतील (by-election) विजयाचा जल्लोष आम्ही करणार नाही. कारण, ही पोटनिवडणूक आहे. ती माझ्या पतीच्या दुर्दैवी घटनेनंतर लागलेली आहे. माझ्या मनात खंत आणि दुःख आहे की, मला माझ्या पतीच्या जागेवर निवडणूक लढवावी लागली आहे, अशा शब्दांत अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील विजयानंतर ऋतुजा लटके (Rituja Latke)) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (Will not celebrate victory in Andheri by-election : Rituja Latke)

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ६६ हजार २४७ मते मिळवत विजय नोंदवला. या निवडणुकीचे वैशिष्ट्ये म्हणजे नोटाला दुसऱ्या क्रमांकाची १२ हजार ७७६ मते मिळाली आहेत. विजयानंतर माध्यमांशी बोलताना लटके यांनी ही माहिती दिली.

Rituja Latke
अंधेरीतील विजयानंतर ऋतुजा लटकेंचा भाजपवर गंभीर आरोप

शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मिळालेले नवे नाव आणि चिन्ह यानंतरची ही पहिली निवडणूक आहे, त्यामुळे सगळीकडे आनंद साजरा केला जाईल. मात्र आम्ही जल्लोष साजरा करणार नाही. कारण मला माझ्या पतीच्या जागेवर निवडणूक लढवावी लागली, याची खंत आहे, असेही लटके यांनी नमूद केले.

Rituja Latke
ऋतुजा लटकेंची मोठ्या विजयाकडे वाटचाल : बाराव्या फेरीअखेर ४५ हजार मते, तर नोटाला ८८८७ मते

ऋतुजा लटके म्हणाल्या की, मी सर्वपक्षीय नेत्यांचे आभार मानते. सर्वप्रथम आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि अंधेरी पोटनिवडणुकीची संपूर्ण जबाबदारी एकहाती सांभाळणारे अनिल परब या सर्वांचे मी आभार मानते. मी महाविकास आघाडीची उमेदवार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांची मी ऋणी आहे. माझी उमेदवारी जाहीर झाल्यापासून महाआघाडीत सर्वच पक्षाचे कार्यकर्ते परिश्रम घेतले आहे. तसेच, रमेश लटके यांनी हाती घेतलेली जी कामे अर्धवट आहेत, ती पूर्ण करण्यास माझे प्राधान्य राहणार आहे. अंधेरीचा विकास जनतेच्या साथीने करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com