'मनसे'ची बाळासाहेबांच्या शिवसेनेशी युती होणार?, आमदार पाटलांचं सूचक विधान

MNS : राज ठाकरेंनी विद्युत रोषणाईच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली
MNS MLA Raju Patil Latest News
MNS MLA Raju Patil Latest News Sarkarnama

डोंबिवली : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रविवारी (ता.२३ ऑक्टोबर) डोंबिवलीतील मनसे कार्यालयात उपस्थिती लावल्याने महायुतीची एकच चर्चा शहरात रंगली आहे. याविषयी मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी एक सूचक विधान केले आहे. युतीचा निर्णय हा सर्वस्वी राज यांचा आहे. भविष्यात त्यांनी आम्हाला सांगितले की युती करायची आहे, तर त्यालाही आम्ही तयार असू. हे निश्चित की इथे आमची मन जुळली आहेत, वरती तारा जुळल्या की सगळं जुळून येईल, असे सांगत आमदार पाटील यांनी भविष्यात राज यांच्या मनात आले तर, शिंदे गट मनसेची युती होऊ शकते याला अप्रत्यक्ष दुजोरा दिला आहे.

राज ठाकरे यांच्या विद्युत रोषणाईच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. शिंदे गट, भाजपा व मनसे एकाच व्यासपीठावर आल्याने भविष्यात यांची महायुती होऊ शकते याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यानंतर डोंबिवलीमध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावतीने फडके रोडवर एका सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमा दरम्यान खासदार डॉ. शिंदे, भाजपचे माजी उप महापौर राहूल दामले, मनसेचे माजी विरोधी पक्षनेते व गटनेते प्रकाश भोईर, मनोज घरत यांनी देखील उपस्थिती लावली. भाजप, शिंदे गट आणि मनसेचे पदाधिकारी एकाच व्यासपीठावर आल्याने चर्चांना सुरुवात होत असतानाच खासदार डॉ. शिंदे यांनी जवळील मनसेच्या जनसंपर्क कार्यालयाला भेट दिली. या भेटीमुळे या चर्चांना आणखीनच उधाण आले आहे.

यावेळी खासदार शिंदे यांनी आम्ही एकमेकांच्या कितीही विरोधात असलो तरी एकमेकांचे सल्ले, विरोधी सूचना घेऊन जर पुढे गेलो तर चांगला मार्ग निघतो, असे सांगितले होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना त्यांच्या मतदार संघातील कामावरुन लक्ष करीत राजू पाटील यांनी आपली विरोधी पक्षाची भूमिका चोख बजावित आहेत. या कामांवरुन शिंदे व पाटील यांच्यातील शीतयुद्ध आत्तापर्यंत सर्वांनीच पाहीले आहे. खासदारांनी प्रथमच विरोधकांच्या भूमिकेचे हसत स्वागत केले असून पाटील यांच्यासोबत दिलजमाई करण्यास खासदार तयार आहेत का? याचीही आता चर्चा रंगली आहे.

भाजपा, (BJP) मनसे, (MNS) शिंदे गट कार्यक्रमात एकत्र आल्याबद्दल आमदार पाटील म्हणाले, राज ठाकरे हे गेली 10 वर्षे शीवतिर्थावर विद्युत रोषणाईचा कार्यक्रम करतात. त्यांनी यावर्षी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना ही आमंत्रित केले होते. शिवतीर्थावरील रोषणाईची झलक आम्ही डोंबिवलीत दाखवू केली आहे. फडके रोडवर ही रोषणाई करण्यात आली असून येथेच रविवारी खासदार शिंदे यांचा संगीत रजनीचा कार्यक्रम होता. कार्यक्रमा दरम्यान एकमेकांच्या भेटीगाठी होतात. फडके रोडवर सर्व संस्थांचे पक्षाचे कार्यक्रम होत असताच. दिवाळीत याला कोणी आडकाठी करत नाही, ही आमची संस्कृती पण नाही. काल खासदार शिंदे येथे आले. आमच्या शहराध्यक्षांनी त्यांना विनंती केली कार्यालयात येऊन जा ते येऊन गेले बरे वाटले.

राजकारणात आम्ही कितीही विरोधक असले तरी दुष्मन नाही. राजकारणात दिसताना चित्र वेगळ दिसत असेल, परंतू सगळ्या गोष्टी तशा नसतात राजकारण वेगळ असतं. युती करायची की नाही करायची हा सर्वस्वी निर्णय राज ठाकरे यांचा आहे. त्यांनी आम्हाला आदेश दिले आहेत की स्वतंत्र लढायचे आहे आपल्याला, त्यादृष्टीने आम्ही तयारी करत आहोत. भविष्यात त्यांनी सांगितले की युती करायची आहे, आम्ही त्यालाही तयार असू. हे निश्चित की इथे आमची मन जुळली आहेत वरती तारा जुळल्या की सगळं जूळून येईल असे सूचक विधान करत त्यांनी अप्रत्यक्ष रित्या भविष्यात राज यांना वाटले तर महायुती होऊ शकते याला अप्रत्यक्ष दुजोरा दिला आहे.

प्रत्येक वेळेस राजकारण करण्याची आवश्यकता नसते. काही गोष्टी आमच्या जुळून येत असतील, त्याने जवळीक वाढत असेल तर त्यातून कुणी वेगळे अर्थ काढायची आवश्यकता नाही.

जर माझी चार काम खासदार शिंदे यांच्यामुळे होत असतील, त्यांनी मला कार्यालयात बोलावंल तर मी जाईल. लोकांसाठी किंवा सणासुदीला एकत्र येण्यास काही हरकत नाही यातून एवढाच अर्थ काढावा असेही पाटील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com