शिक्षक मतदारसंघात विरोधी मतांच्या विभाजनाचा  लाभ कपिल पाटील उठवणार ?

या मतदारसंघात गेल्या दोन्ही वेळेस शिक्षक परिषदेचे कपिल पाटील निवडून आले आहेत. कपिल पाटील आता तिस-यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत.
Kapil-Patil-MLC
Kapil-Patil-MLC

मुंबई : शिवसेना व भाजप या पारंपरिक मित्रांमध्ये वैरभाव निर्माणझाल्यानंतर ते आता सगळ्याच निवडणुकांमध्ये एकमेकांच्या विरोधात लढत आहेत.विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक मतदार संघासाठी येत्या २५ जून रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीतही या दोन्ही पक्षांनी आपापले स्वतंत्र उमेदवार जाहीर केले आहेत. 

पण दोन्ही पक्षांचे प्रत्यक्ष शिक्षकांमध्ये प्रभावी कामनसल्याने निवडणुकीच्या निमित्ताने एकमेकां विरोधात दंड थोपटण्यापलिकडे या दोन्ही पक्षांना काहीही साध्य होणार नाही, अशी चर्चा शिक्षकांमध्ये सुरू आहे.

या निवडणुकीसाठी भाजपने अनिल देशमुख यांचे, तर शिवसेनेने शिवाजी शेंडगे यांचे नाव जाहीर केले आहे. देशमुख हे आतापर्यंत स्वतंत्रपणे शिक्षकचळवळीत काम करीत होते. निवडणुकीच्या तोंडावर त्यांना भाजपने समर्थन दिले आहे. परंतु निवडणुकीसाठी आवश्यक असणारी बांधणी करण्यात देशमुख फारच कमी पडलेले आहेत. 

आतापर्यंत भाजपच्या वतीने महाराष्ट्र शिक्षक परिषद ही
निवडणूक लढवत होती. आता मात्र भाजप व शिक्षक परिषद यांच्यात वितुष्ट निर्माण झाल्याने दोन्ही संघटना स्वतंत्रपणे निवडणुका लढविणार आहेत.

शिक्षक परिषदेकडून अनिल बोरनारे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. पण भाजपव परिषदेतील भांडणामुळे पारंपरिक मतांची फाटाफूट होण्याचीच शक्यता व्यक्त केली जात आहे. 

शिवसेना आतापर्यंत भाजपप्रणीत शिक्षक परिषदेला पाठिंबा देत आली आहे. पण यावेळी शिवसेनाही स्वतंत्रपणे निवडणूक लढवित आहे.

भाजपप्रमाणेच शिवसेनेचेही शिक्षक चळवळीत फारसे काम नाही. आपसुकच भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांना शिक्षक मतदारांमध्ये प्रभाव टाकण्यात यश आले नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

या मतदारसंघात गेल्या दोन्ही वेळेस शिक्षक परिषदेचे कपिल पाटील निवडून आले आहेत. कपिल पाटील आता तिस-यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. पाटील यांच्या विरोधात खमका उमेदवार उभा करण्यात सगळ्याच संघटनांना अपयश आले आहे. 

दुस-या बाजूला प्रत्यक्ष शिक्षकांमध्ये जाऊन मतदारांची बांधणीकरण्यातही शिवसेना व भाजप हे दोन्ही पक्ष कमी पडले आहेत. त्यामुळे सेना -भाजपच्या बेटकुळ्या पाहून शिक्षक मतदारांचे मनोरंजन होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com