Sushma Andhare News : शिरसाटांना 'क्लिनचिट' देणाऱ्या अधिकाऱ्याला शोधणार, अन्...; सुषमा अंधारे संतापल्या

Devendra Fadnavis : गृहमंत्री फडणवीसांना प्रश्नांची उत्तरे देण्याचे केले आवाहन
Sanjay Shirsat, Sushma Andhare
Sanjay Shirsat, Sushma AndhareSarkarnama

प्राची कुलकर्णी

Sushma Andhare on Sanjay Shirsat Clean Chit : छत्रपती संभाजीनगरमधील मेळाव्यात शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी शिरसाटांविरोधात महिला आयोगाकडे तक्रार केली होती. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी शिरसाट यांना 'क्लिनचीट' दिली आहे.

संजय शिरसाट यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबाबत महिला आयोगाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केली होती. यासह अंधारे यांनी शिरसाट यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात शिरसाटांविरोधात तीन रुपयांच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला. दरम्यान, संभाजीनगर पोलिसांनी शिससाट यांना 'क्लिनचिट' दिली. 'व्यक्ती समोर नसल्यामुळे विनयभंग होत नाही', असा दावा पोलिसांनी केला आहे.

Sanjay Shirsat, Sushma Andhare
Raj Thackeray: शिवराज्याभिषेक सोहळ्याबाबत राज ठाकरेंची भावनिक पोस्ट; म्हणाले, आज जे मी अनुभवलं ते...

शिरसाटांना पोलिसांनी 'क्लिनचिट' दिल्यानंतर अंधारे चांगल्याच संतापल्या आहेत. त्या म्हणाल्या, "संजय शिरसाट (Sanjay Shirsat) उर्मट, असंसदीय, असभ्य माणूस आहे. मला अशा लोकांबाबत काहीही बोलायचे नाही." यानंतर त्यांनी छोटा मेंदू असलेल्या लोकांना किंमत नको द्यायला, असा टोलाही शिरसाटांना लगावला. त्या म्हणाल्या, "पृथ्वीचा आकार केवढा.. ज्याचा त्याचा मेंदू एवढा. ज्याचा मेंदू छोटा.. बक्ष दिया..!"

यावेळी अंधारे यांनी शिरसाटांना 'क्लिनचिट' देणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात तक्रार करणार असल्याचाही इशारा दिला. अंधारे म्हणाल्या, गृहमंत्री देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) यांना या प्रकरणात लक्ष घालावे. माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. या प्रकरणात संजय शिरसाट यांना क्लीन चिट देणारा अधिकारी कोण आहे? त्या अधिकाऱ्याला मी शोधणार आहे. त्या आधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल करणार आहे."

Sanjay Shirsat, Sushma Andhare
Sushilkumar Shinde News : ‘शंकरराव मोहिते पाटलांपासून मी अकलूजला जातोय; पण, काही लोकं भांडणं लावण्याचं काम करतात’ : सुशीलकुमार असं का म्हणाले

काय म्हणाले होते शिरसाट ?

काही दिवसांपूर्वी सुषमा अंधारेंवर टीका करताना संजय शिरसाट यांनी आक्षपार्ह्य वक्तव्य केले होते. शिरसाट म्हणाले होते की, "ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. सत्तारभाऊ माझेच भाऊ आहेत, भुमरेभाऊ पण माझेच भाऊ आहेत. पण तिने काय-काय लफडी केली, हे तिलाच माहीत.” या वक्तव्य विरोधात सुषमा अंधारे यांनी दावा ठोकला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com