माजी सैनिक आघाडी खरंच भाजपशी काडीमोड घेणार?

BJP Ex-Army Front : "भाजप सरकारकडून सैनिकांच्या प्रश्नांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. सैनिकांच्या हितामध्ये गोष्टी झाल्या नाहीत. "
Army Front
Army FrontSarkarnama

मुंबई : भाजपला (BJP) आता मोठा झटका बसण्याची शक्यता दिसत आहे. भाजपशी संलग्न असणारी माजी सैनिकांची संघटना भाजपमधून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. राज्यभरातील सैनिकांनी भाजपविरोधात लढाईला सुरूवात केली असून, भाजपला जबरदस्त धक्का देण्याच्या तयारीत आहेत. (BJP Ex-Army Front)

मागील ९ वर्षापासून केंद्रात भाजप सत्तेत आहे, तसेच राज्यात देखील सत्तेत आहे. असे असतानाही भाजप सरकारकडून सैनिकांच्या प्रश्नांकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. सैनिकांच्या हितामध्ये काही गोष्टी झाल्या नाहीत. त्यामुळे राज्यभरातील सैनिकांनी भाजपविरोधात रण पुकारले आहे.

सैनिक भाजपविरोधात लढाईला उतरले असून, पक्षाला जबरदस्त धक्का देतील, असे चिन्हे दिसत आहेत. भाजपशी संलग्न असणाऱ्या माजी सैनिक आघाडीत राज्यातील सध्या आजी, माजी मिळून 10 लाख सैनिक सभासद आहेत. यामुळे भाजपची माजी सैनिक आघाडी खरंच भाजपशी काडीमोड घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Army Front
शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिक यांच्या कन्येचा शिंदे गटात प्रवेश!

भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत माजी सैनिक आघाडीचे प्रतिनिधी मुंबईत आज दुपारी एक वाजता माजी महत्वपूर्ण बैठक घेणार आहे. या बैठकीनंतर भाजप माजी सैनिक आघाडी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. यानंतरच सैनिक आघाडीची पुढची रणनिती स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com