संजय पांडेना कायम ठेवल्यास अवमान याचिका दाखल होणार?

आयोगाने महासंचालकपदासाठी रजनीश सेठ, डॉ.व्यंकटेशन आणि हेमंत नगराळे या तीन अधिकाऱ्यांची शिफारस केली आहे.
Sanjay Pande
Sanjay Pande

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) महाराष्ट्राचे कार्यकारी पोलिस महासंचालक संजय पांडे (Sanjay Pande) हे महासंचालक (Director General of Police) पदावर काम करण्यास अपात्र असल्याची शिफारस केली आहे. लोकसेवा आयोगाने महासंचालक पदासाठी तीन अधिकाऱ्यांच्या नावांची शिफारस केली आहे. या तीनपैकी एका अधिकाऱ्यांची महासंचालकपदी निवड करणे बंधनकारक असते. मात्र जर आयोगाच्या शिफारशी मंजूर न करता संजय पांडे यांनाच पदावर कायम ठेवल्यास सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाल्याची याचिका दाखल केली जाण्याची शक्यता आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून महासंचालक पदासाठी ज्या अधिकाऱ्यांच्या नावांची शिफारस केली जाते, त्याच अधिकाऱ्यांची महासंचालक पदावर निवड करणे बंधनकारक असते. त्यानुसार आयोगाने महासंचालकपदासाठी रजनीश सेठ, डॉ.व्यंकटेशन आणि हेमंत नगराळे या तीन अधिकाऱ्यांची शिफारस केली आहे. त्यामुळे संजय पांडे पदावरुन पायउतार होण्याचे संकेत मिळत आहे. त्याचबरोबर या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील, असे गृहविभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Sanjay Pande
संजय पांडेंचा पत्ता कट! महासंचालकपदासाठी तीन पोलीस अधिकारी शर्यतीत

मात्र महाराष्ट्रातील काही सनदी अधिकाऱ्यांनी आयोगाने केलेल्या शिफारशी प्रत्यक्षात आणणे बंधनकारक नसल्याची भूमिका घेतली. तर आयोगाने शिफारसींचे पालन करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. त्याकडे लक्ष देत कारवाई केली गेली नाही तर सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल होवू शकते, याकडे काही अधिकाऱ्यांनी गृहविभागाचे लक्ष वेधले आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता अशी याचिका ही महाविकास आघाडी सरकारवरील टीकेत भर घालणारी ठरेल. विरोधी पक्ष त्याचे भांडवल करेल, अशी चर्चाही आहे.

गेल्या १५ दिवसांपासून लोकसेवा आयोगाच्या पत्रावर महाराष्ट्र सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे रुग्णालयात असल्याने हे घडले असेल, असे सांगण्यात येत आहे. लोकसेवा आयोगाला या शिफारसींचा फेरविचार करा, असे पत्र पाठवायचे का याचाही विचार सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com