अमित शाह आणि राज ठाकरेंची खरच भेट होणार का?,बावनकुळेंनी स्पष्टचं सांगितले

Raj Thackeray : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे ४ सप्टेंबरला दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर येत आहेत.
Raj Thackeray & Amit Shaha Latest News
Raj Thackeray & Amit Shaha Latest NewsSarkarnama

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणातील अनेक समीकरणं बदलतांना दिसत आहेत. त्यात आता भाजप (BJP) नेत्यांची आणि मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची वाढती जवळीक यामुळे महाविकास आघाडीसारखं पुन्हा काही समीकरणं जुळत की काय, असा प्रश्न राजकीय वर्तूळात पडत आहे.

दरम्यान भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे ४ सप्टेंबरला दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्या दरम्यान ते लालबागच्या राजाचं दर्शन तर घेणारच असून काही राजकीय भेटीगाठीही घेणार आहेत. यामुळे ते राज ठाकरेंना भेटणार आहेत अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Raj Thackeray & Amit Shaha Latest News)

Raj Thackeray & Amit Shaha Latest News
दसरा मेळावा : पंकजा मुंडेसारखी वेळ उद्धव ठाकरेंवर येणार का?

आगामी मुंबई महापालिका आणि राज्यातील इतर निवडणुकांच्या दृष्टीने शहांचा हा मुंबई दौरा महत्त्वाचा मानला जातो आहे. या दौऱ्याबाबत बावनकुळेंना विचारले असता ते म्हणाले की, राज ठाकरे हे आमचे चांगले मित्र असून मी देखील त्यांची भेट घेतली होती. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांची भेट घेतली आहे. या सर्व भेटी सदिच्छा भेट असून त्याचा राजकीय अर्थ काढू नये. अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी ते कुणाला भेटणार आणि कुठे जाणार हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. मात्र अद्याप तरी आम्हाला याबाबत कुठलीही माहिती मिळालेली नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

भाजप नेत्यांनी एकापाठोपाठ राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' या राज ठाकरेंच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांनी भेटी घेतल्या आहेत. अशातच आता मुंबईत आल्यानंतर शाह देखील राज ठाकरेंना भेटले तर अश्चर्य नसावे. मात्र ही भेट राजकीयच असेल यात काही शंका नाही. दरम्यान शाह आणि राज ठाकरे यांची भेट होणार याच्या चर्चा मोठ्या प्रमाणावर होत आहेत. बावनकुळे यांनी अद्याप आपल्याला याबाबत माहिती नाही असे जरी म्हटले असेल तरी त्यांनी भेटीची शक्यता नाकारलेली नाही. हे विशेष.

Raj Thackeray & Amit Shaha Latest News
फडणवीस म्हणतात, मी महाराष्ट्रात तुम्हाला नकोय का?

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि भाजपची जवळीकता कमालीची वाढली आहे. त्यांचं गुढीपाडव्याच भाषण चांगलच गाजलं होतं. त्यानंतर घेतलेली उत्तरसभा आणि त्यापुढच्या सभाही गाजल्या. मशिदींवरच्या भोंग्यांचा आवाज बंद झाला पाहिजे नाहीतर आम्हाला हनुमान चालीसा सुरू करावी लागेल. हा इशारा त्यांनी दिला होता. ज्याचा परिणाम मुंबईसह महाराष्ट्रात बघायला मिळाला होता. यामुळे मनसे आणि भाजप यांची युती होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यात मुंबई पालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजप काय रणनीती आखत हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in