मंत्रिमंडळ विस्तार का रखडला? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं...

Sanjay Raut| गुरुवारी (२८ जुलै) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके यांची भेट घेतली.
Sanjay Raut|
Sanjay Raut|

मुंबई : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके अनेक कठीण प्रसंगात, वादळात ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत उभे राहिले. डाके, जोशी यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्यांच्यासारख्या कडवट, निष्ठावान शिवसैनिकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भेटणं ही चांगली गोष्ट आहे. नक्कीच त्यांना त्यांच्याकडून प्रेरणा आणि बोध मिळेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी (२८ जुलै) मनोहर जोशी आणि लीलाधर डाके यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. आज सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी यावर भाष्य केले. ''मुख्यमंत्र्यांच्या दिल्लीच्या वाऱ्या-फेऱ्या सुरू आहेत, पण अजून मंत्रिमंडळ स्थापन झालेले नाही. यातूनही वेळ काढून मुख्यमंत्री राज्याचा दौरा करत फिरत असतील तर त्यावर टीका करण्याचे कारण नाही. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार का रखडलाय हे हम दो और हमारे दो सांगू शकतील, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

Sanjay Raut|
Buldhana news : शिंदे गटाला एकही उमेदवार मिळू देणार नाही; नरेंद्र खेडेकर यांचा इशारा

प्रत्येकाची स्वप्ने असतात, माझंही स्वप्न आहे. राज्यात सत्तांतर होईल या माझ्या मताशी मी ठाम आहे, कोणाला हे स्वप्न वाटत असेल, पण हे माझं स्वप्न आहे. प्रत्येकाचं स्वप्न असते, एखाद्याला मिळेल त्या मार्गाने मुख्यमंत्री व्हायचं असतं, तसं माझंही स्वप्न आहे, आम्हालाही महाराष्ट्रात सत्ता आणायची आहे, पण मिळेल त्या मार्गाने नाही. लोकांमध्ये जाऊन लोकशाही मार्गाने आम्हाला सत्ता मिळवायची आहे आणि ती वेळ लवकरच येईल, असा विश्वासही संजय राऊतांनी व्यक्त केला.

माझा आवाज बंद करण्यासाठी मला ईडीच्या नोटीसा पाठवल्या गेल्या. पुन्हा समन्स आल्यावर पाहू, पण संजय राऊत काय आहे हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांना माहित आहे. शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेसोबतच राहणार, कितीही दबाव आला तरी गुडघे टेकणार नाही, असं राऊतांनी ठणकावलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in