पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी का नाकारली? फडणवीसांनी सांगितले कारण
Devendra Fadanvis| Pankaja Munde|Sarkarnama

पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी का नाकारली? फडणवीसांनी सांगितले कारण

Devendra Fadanvis| Pankaja Munde| पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना विधानपरिषदेची उमेदवारी नाकारल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. या मुळे राज्यात ठिकठिकाणी त्यांच्या समर्थनार्थ निषेधही नोंदवला. तर पंकजा मुंडेंही नाराज असल्याचीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. असे असताना पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी न मिळण्याबाबत विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं. (Pankaja Munde Latest news)

पंकजा मुंडे भाजपच्या कार्यक्रमांमध्ये दिसत नाहीत, त्या नाराज आहेत का असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, पंकजा मुंडे मध्य प्रदेशचा प्रभार सांभळत आहेत आम्ही सगळेच एकमेकांच्या संपर्कात आहोत. पंकजाताई भाजपच्या मोठ्या नेत्या आहेत. त्यांच्याकडे मध्य प्रदेशचा चार्ज आहे. आता मध्य प्रदेशात निवडणूका आहेत. तिथला प्रभार त्या सांभाळत आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी करु नका. भाजप हे एक कुटूंब आहे. आम्ही सगळे या कुटूंबाचे सदस्य आहोत."

Devendra Fadanvis| Pankaja Munde|
हिंदू धर्मासाठी संत तुकोबारायांचं मोठ योगदान : देवेंद्र फडणवीस

गेल्या काही महिन्यांपासून पंकजा मुंडे सध्या राज्याच्या राजकारणात फारशा सक्रिय दिसत नाहीत. मध्यप्रदेशच्या सहप्रभारी म्हणून भाजपने त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे. दरम्यान, आगामी विधानपरिषदेसाठी पंकजा मुंडेंना संधी मिळेल, असे बोलले जात होते. पण प्रत्यक्ष भाजप उमेदवारांची घोषणा झाली त्यात पंकजा मुंडेंचं नाव नव्हतं. त्याउलट भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांना आमदारकीसाठी उमेदवारी देण्यात आली. तर केंद्रीय पातळीवरुन हा निर्णय झाल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

महाराष्ट्रात सध्या भाजपचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. अशातच महाराष्ट्रात पंकजा मुंडेंच्या रुपाने दुसरे सत्ताकेंद्र निर्माण करणं टाळण्यात आलं का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर गेल्या काही दिवसांपासून राजकारणात सक्रीय नसलेल्या विनोद तावडे यांनाही राष्ट्रीय सरचिटणीस करुन त्यांना राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी देण्यात आली. चंद्रशेखर बावनकुळे यांनादेखील आमदारकी देऊन भाजपने त्यांच पुनर्वसन केलं. पण पंकजा मुंडेंना मात्र अजूनही प्रतिक्षेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in