Chandrashekhar bawankule : भाजपचा कसब्यात पराभव का झाला? बावनकुळेंनी सांगितलं कारण...

Kasba By Election Result : ''कसबा पोटनिवडणुकीत आम्ही कुठे कमी पडलो?''
Chandrashekhar bawankule
Chandrashekhar bawankuleSarkarnama

Pune News : कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा ऐतिहासीक विजय झाला आहे. धंगेकरांनी ११ हजार मतांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला.

भाजपचा कसबा पोटनिवडणुकीत पराभव का झाला? पराभवाचे कारणं काय आहेत? याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

बावनकुळे म्हणाले, ''निवडणुकीमध्ये त्या-त्या वेळेचं समीकरण असतं. त्यामुळे त्यावर विजय आणि पराभव होणं हे ठरत असतं. आमचा कसब्यात पराभव झाला तो आम्हाला मान्य आहे.

मात्र, आम्ही या पराभवाचं विश्लेषण करणार आहोत. यामध्ये आम्ही कुठे कमी पडलो? त्यामध्ये कोणत्या सुधारणा करण्याची गरज आहे, त्यावर आम्ही लक्ष देऊ'', असं बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar bawankule
Shivsena : बळकटी न देता भानगडीच जास्त, बाजोरियांची हकालपट्टी; जाधव नवे संपर्कप्रमुख !

भाजपवर या पोटनिवडणुकीत पैसा वाटण्याचा आरोप झाला. याबाबत ते म्हणाले, ''आम्ही पैशाचा वापर करून कधीच निवडणूक लढवल्या नाहीत. आमचा तो स्वभाव नाही. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसची परंपरा आहे, आमची नाही'', असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादी, काँग्रेसवर टीका केली.

Chandrashekhar bawankule
Devendra Fadanvis; मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेचा पुर्नविकासाचा सरकारचा प्रस्ताव!

''कसब्यात काँग्रेसच्या विजयाचे खरे श्रेय हे तेथील उमेदवाराचे आहे. त्यांच्याबाबत नागरिकांमध्ये छुपी सहानुभूती होती. त्याचा फायदा त्यांना झाला. धंगेकर हे दोन-तीन वेळा विधानसभेची निवडणूक लढलेले आहेत.

मात्र, हेमंत रासने हे पहिल्यांदा लढले. तसेच धंगेकरांनी शेवटच्या दिवशी उपोषण केलं आणि त्यामधून त्यांना सहानुभूती मिळाली'', असं बावनकुळे यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com