'राऊत दिवसभर उलटसुलट बोलतात, मी का उत्तर देऊ!'

Sanjay Raut| Devendra Fadanvis| भाजप अपक्ष आणि छोट्या पक्षांवर वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे.
'राऊत दिवसभर उलटसुलट बोलतात, मी का उत्तर देऊ!'
Sanjay Raut| Devendra Fadanvis

मुंबई : ‘‘राज्यसभा निवडणुकीत (Rajy Sabha Election) भाजप अपक्ष आणि छोट्या पक्षांवर वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणत आहे. ईडी (ED), सीबीआय (CBI) सारख्या संस्थांच्या माध्यमातून जुनी प्रकरणे उकरून काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणूकीत महाविकास आघाडीची मते फुटणार असल्याचा दावा केला जात आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भारतीय जनता पक्ष अपक्ष आणि काही छोट्या पक्षांवर अवलंबून आहे. भाजप त्यांना अमिषं आणि प्रलोभने दाखवत आहे. त्यांच्यावर वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणणार, हा दबाव कशाप्रकारे आणला जातोय, याची माहिती आमच्याकडे दररोज येते. कारण ज्यांच्यावर दबाव आणला जातोय, ते आमचेही मित्र आहेत. ते आम्हाला सांगतात की, कशा प्रकारे दबाव आणला जातोय. दबाव आणि काही जुनी प्रकरणं जी केंद्राच्या अखत्यारीत आहेत, ती उकरून काढून प्रेशर तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण, त्याचा काही फरक पडत नाही. त्यातून भारतीय जनता पक्षाचे चरित्र दिसून येतं. राज्यात अशा प्रकारे निवडणुका लढवल्या जात असतील, तर राज्यातील जनता डोळसपणे पाहत आहे, असही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut| Devendra Fadanvis
ED,CBI च्या माध्यमातून भाजपचा अपक्ष, छोट्या पक्षांवर दबाव; पण, राज्य सरकार आमचायं, हे लक्षात ठेवा!

त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भाजपचे मत फुटणार का, असा सवाल केला असता त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.''सर्वंच पक्षांमध्ये वेगवेगळ्या पक्षातले लोकं आहेत. त्यामुळे मला वाटत त्यांनी दिवसा स्वप्न पाहू नयेत. राज्यसभा निवडणुकीत भाजपचे एकही मत फुटणार नाही. त्यांच्यापासून त्रासले होते म्हणून ते इकडे आलेले आहेत, असा टोला देवेद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

दरम्यान, भाजपाकडे एजन्सी आहे तर आमच्याकडे राज्य सरकार आहे, असे संजय राऊत म्हणाले आहेत, असे विचारले असता त्यावर, "कोण संजय राऊत असा उलट प्रश्न त्यांनी उपस्थित केला.तसेच, संजय राऊत काय फार मोठे तत्त्ववेत्ते आहेत का की ते दिवसभर काही उलट सुलट बोलत राहतील आणि त्यांच्या प्रश्नावर मी का उत्तरं देऊ, असही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in