एमआयएमचा कॉंग्रेसलाच पाठिंबा का; पृथ्वीराज चव्हांण म्हणाले...

Rajya sabha Elelction 2022| AIMIM| Pruthviraj chavan| राज्यसभेचा निवडणूकीत एआयएमआयएम ने महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शवला.
एमआयएमचा कॉंग्रेसलाच पाठिंबा का; पृथ्वीराज चव्हांण म्हणाले...
Pruthviraj chavan|

Rajya sabha Elelction 2022

मुंबई : ''महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) चारही उमेदवार जिंकावेत यासाठी आमचा प्रयत्न सुर आहे. त्या दृष्टीने गेल्या दोन दिवसांपासून आमचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे कोणी काहीही दावा केला तरी मतांची संख्या उघड आहे आणि महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे,'' असे स्पष्टीकरण कॉंग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj chavan) यांनी घेतला आहे.

राज्यसभेचा निवडणूकीत एआयएमआयएम ने महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शवला. कॉंग्रेसचे इमरान प्रतापगढी यांना एमआयएमने पाठिंबा दिला. गेल्या सहा- सात दिवसांपासून ज्या घडामोडी सुरु आहेत त्या महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार जिंकण्यासाठीच सुरु आहेत. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार जिंकण्यासाठीच आम्ही ही रणनिती आखली आहे. असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Pruthviraj chavan|
एमआयएमचा महाविकास आघाडीला पाठिंबा: पण शिवसेनेला मत देणार नाही

दरम्यान, एमआयएमने कॉंग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर एमआयएम ही महाविकास आघाडीची बी टीम असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी हे आरोप फेटाळून लावले आहे. एमआयएमने हा निर्णय कोणत्या स्तरावर याची कल्पना नाही. पण काँग्रेसचे 44 संपूर्ण मतदान झाले आहे. ही आघाडीची स्ट्रॅटेजी आहे. ठरल्याप्रमाणे काँग्रेसची अतिरिक्त मते आणि राष्ट्रवादी मित्रपक्षाची मते संजय पवार यांना दिली आहेत. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील याची खात्री आहे.

तसेच, भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या नेत्यांनी बॅलेट पेपर जयंत पाटील यांच्या हातात दिल्याचा आरोप केला. तसेच जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांचे मत बाद करण्याची मागणी केली. मात्र निवडणूक आयोगाने भाजपची ही मागणी फेटाळून लावल्याचेही यावेळी त्यानी सांगितले.

दरम्यान, ''भाजपचा पराभव करण्यासाठी आम्ही राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान करणार आहोत. राज्यसभा निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा दिला असला तरी शिवसेनेसोबत आमचे राजकीय, वैचारीक मतभेद कायम असतील,'' असे ट्विट करत इम्तियाज जलील यांनी एमआयएमची भूमिका स्पष्ट केली आहे. तर दुसऱ्या ट्वीटमध्ये “आमच्या आमदारांच्या मतदारसंघात विकाससाठी आम्ही काही अटीशर्थी ठेवल्या आहेत. तसेच एमपीएससीमध्ये अल्पसंख्यांक सदस्याची नियुक्ती व्हावी अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे उत्पन्न वाढवण्यासाठी पावले उचलावीत आमि मुस्लिमांसाठी आरक्षणाची मागणी एमआयएमने केली आहे.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in