देशद्रोही, गुन्हेगारांविषयी भाजपला एवढी मळमळ का? संजय राऊतांचा सवाल

Sanjay Raut | BJP| राज्य उलथवण्याचा, लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न सुरु आहे
देशद्रोही, गुन्हेगारांविषयी भाजपला एवढी मळमळ का? संजय राऊतांचा सवाल
Sanjay Raut |

मुंबई : जे देशद्रोही, गुन्हेगार आहेत त्यांच्याविषयी भाजपला (BJP) एवढी मळमळ का आहे? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. तुमच्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या तपासाबाबत आम्ही तुम्हाला कधी विचारलं का? मग पोलिस जर कारवाई करत असतील तर काही असेल तर कारवाई होईलच ना, असंही त्यांनी म्हटले आहे.

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली. या निर्णयानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेत त्यांचयासह केंद्र सरकारवर निशाणा साधला.

Sanjay Raut |
कितीही चौकशी करा! मनमोहनसिंग सरकारच्या शेवटच्या कायद्याला फडणवीसांनी बनवले कवच

केंद्र सरकारची झेड प्लस सिक्युरिटी हाच एक घोटाळा आहे. सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानचे सर्व अकाऊंट चेक केल्यानंतर अनेक गोष्टी समोर येतील. त्यांच्या अनेक देणगीदारांवर ईडीची कारवाई सुरु आहे. त्यांचे अकाऊंट तपाल्यावर अनेक गोष्टी बाहेर पडतील. एफआयआर काय असावी हे विक्रांत घोटाळा केलेल्या आरोपीने सांगू नये. असा टोलाही संजय राऊत यांनी लागावला.

भाजपला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची आहे. त्यासाठी राज्यात अशांतता पसरवण्यासाठी आणि दंगल घडवून आणण्यासाठी मोठं षडयंत्र रचलं जात आहे. गुणरत्न सदावर्ते प्रकरणात हेच झालं, राज्य उलथवण्याचा, लोकांना भडकवण्याचा प्रयत्न सुरु आहेत, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

महाविकास आघाडीतील मंत्री नेत्यांच्या घरावर हल्ले करायचे, दोन आठवड्यांपूर्वी खासदार शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरावर प्रयत्न केला. दंगलसदृश परिस्थिती निर्माण करायची, त्यांच्या मनासारखं घडलं की राज्यपालांकडे राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायची. हे असे भाजपचे सगळे उद्योग सुरु असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धार्मिक तणाव निर्माण करुन राज्य सरकार उलथवण्याचा प्रयत्न सुरु आहे. हनुमान चालीसाला कोणाचाही विरोध नाही. राणा दाम्पत्यांनी हनुमान चालीसा कुठेही वाचावी. स्वत:च्या घरात हनुमान चालीसा वाचावी. महाराष्ट्रामध्ये हिंदूंच्या कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाला विरोध नाही. पण तुम्ही घुसून वाचण्याचा हट्ट केला, तुझ्या बापाचं राज्य आहे का?, असा संतप्त सवालही संजय राऊत यांनी केला. हिंदूंना आपण नेहमी प्राधान्य दिले, पण तुमचा हट्ट तरी कशासाठी, असेही त्यांनी विचारले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.