Patole On Chavan : अशोक चव्हाणांवर पाळत का ठेवली जात आहे? : नाना पटोलेंचा शिंदे-फडणवीसांना सवाल

सत्तेत बसलेल्या लोकांकडून विरोधकांना संपवण्याचे काम केले जात आहे.
Nana Patole, Ashok Chavan, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Nana Patole, Ashok Chavan, Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यावर पाळत का व कशासाठी ठेवली जात आहे? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारला आहे. (Why is Ashok Chavan under surveillance: Nana Patole's question to Shinde-Fadnavis)

राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी त्यांच्यावर खासगी व्यक्ती पाळत ठेवली जात आहे. त्यांचा घातपात करण्याचा प्रयत्न असल्याची तक्रार पोलिसांकडे दिली आहे. पोलिस व राज्य सरकारने याची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी आणि दोषींना कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही पटोले यांनी केली.

Nana Patole, Ashok Chavan, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Pandharpur News : प्रणिती शिंंदेंनी मतदारसंघापुरते सीमित राहू नये; जिल्हाभर काम करावे : काँग्रेस नेत्याचा सल्ला

शिवसेना खासदार संजय राऊत यांना मारण्याची सुपारी दिल्याची तक्रारही संजय राऊत यांनी दिली आहे. सत्तेत बसलेल्या लोकांकडून विरोधकांना संपवण्याचे काम केले जात असेल तर लोकशाही व्यवस्थेला हे काळीमा फासणारे आहे. शाहू, फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात विरोधकांना संपवण्याचे काम होत असेल तर ते कदापी सहन केले जाणार नाही. महाराष्ट्रात अशा प्रकारचे राजकारण याआधी कधीच नव्हते. सत्तेत वाईट मानसिकतेचे लोक बसले आहेत, त्यांच्या इशाऱ्यावर जर असे प्रकार होत असतील तर राज्यासाठी ते अत्यंत भयानक आहे. राज्य सरकारने अशोक चव्हाण व खासदार संजय राऊत यांच्या प्रकरणात गांभिर्याने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, असेही पटोले यांनी नमूद केले.

Nana Patole, Ashok Chavan, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Supreme Court Hearing : बहुमत चाचणीपूर्वीच उद्धव ठाकरेंनी राजीनामा का दिला? युक्तीवादात सिब्बलांनी दिले उत्तर...

पटोले म्हणाले की, मागील सहा-सात महिन्यात राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे. विशेषतः सत्ताधारी पक्षाचे लोकच दादागिरी करत आहेत. विरोधकांना शत्रू मानून त्यांना संपवण्याचे प्रकार होत आहेत. मागील महिन्यात काँग्रेसच्या महिला आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला करण्यात आला. औरंगाबादमध्ये माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला.

Nana Patole, Ashok Chavan, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Supreme Court Hearing : सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड : सरन्यायाधीशांचा सवाल; ठाकरे गटाच्या वकिलांनी सुचविला ‘हा’ तोडगा

सत्ताधारी आमदाराने विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार केला. आमदारच हातपाय तोडण्याची भाषा करत आहेत. हे सर्व प्रकार महाराष्ट्रासारख्या राज्यात वाढले आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आहे. राज्य सरकारने या प्रकरणी तातडीने लक्ष घालून दोषींना अद्दल घडवावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com