Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद का गेलं? मनसे नेत्यानं सांगितली 'ही' चार कारणं

MNS News: 'ईडी'च्या चौकशीत राज ठाकरेंना 'क्लिन चिट', तर राऊत तीन महिने तुरुगांत
Uddhav Thackeray, Raj Thackeray
Uddhav Thackeray, Raj ThackeraySarkarnama

Maharashtra Politics: शिवसेनेत जून २०२२ मध्ये फूट पडून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. आता शिंदे-फडणवीस सरकार येऊनही सहा महिने उलटले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे गटाला दिले. महाविकास सरकार पडल्यानंतर शिवसेनेत फूट पडल्याबाबत अनेक चर्चा रंगल्या. त्या चर्चा आठ महिन्यांतरही थांबण्यास तयार नाहीत. त्याची अनेक कारणे आताही समोर येत आहेत.

उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद का गेलं, याबाबत मनसेचे उपनेते यशवंत किल्लेदार (Yashwant Killedar) यांनी थेट चार कारणे सांगितली आहेत. त्यात त्यांनी काही धक्कादायक खुलासेही केले आहेत. दरम्यान, संबंधित आमदार ठाकरेंना काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करीत होते, मात्र त्यांना भेटण्याची तसदीही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) घेत नसल्याचा आरोपही किल्लेदार यांनी केला आहे. तसेच ज्यांचा पक्ष नेस्तनाबूत झाला आहे, त्यांनी मनसेवाढीची काळजी करू नये, असाही टोला लगावला आहे.

Uddhav Thackeray, Raj Thackeray
Devendra Fadanvis ; जुनी पेन्शन योजना स्विकारल्यास भविष्यात संकट

यशवंत किल्लेदार म्हणाले, "उद्धवजींची कार्यपद्धत, अदित्यंची (Aditya Thackeray) कार्यपद्धत, रश्मीवहिनींचा (Rashmi Thackeray) हस्तक्षेप, संजय राऊतांचा (Sanjay Raut) रोजसकाळचा भोंगा आणि त्यांची उलटसुलट वक्तव्य या गोष्टींना ४० आमदार आणि १३ खासदारांना मान्य नव्हत्या. त्या सगळ्यांचा त्यांना उबग आली होती. तसेच मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेल्याचेही त्यांना मान्य नव्हते. याबाबत ते पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंना वारंवार सांगत होते. पण पक्षप्रमुखांना आमदारांना भेटायलाही वेळ नव्हता. शेवटी सयंमाचा अंत होतो आणि तो अंत गुवाहटीला जाऊन झाला. त्यामुळे सरकार पडलेले आहे."

आता शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला गेले आहे. त्यामुळे ठाकरे गटातील नेत्यांनी मनसेवाढीबाबत चिंता करू नये. त्यांनी आपला पक्ष कसा उभा राहील, याकडले लक्ष द्यावे, असा टोलाही किल्लेदार यांनी लगावला. यशवंत किल्लेदार म्हणाले, "त्यांचा पक्ष आता नेस्तनाबूत झालेला आहे. आता त्यांनी त्यांच्या पक्षावर लक्ष द्यावे. मनसे पक्ष (MNS) किती वाढलेला आहे, ते महानगर पालिकेच्या निवडणुकीत त्यांना दिसेल."

Uddhav Thackeray, Raj Thackeray
Supriya Sule : नागालँडमध्ये भाजप-राष्ट्रवादी सत्तेत एकत्र,सुळे म्हणाल्या,''फडणवीसांकडे १०५ आमदार तरी..''

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरेंना ईडीच्या (ED) कारवाईवरून छेडले आहे. त्याबाबत राऊतांचाही किल्लेदार यांनी समाचार घेतला. यशवंत किल्लेदार म्हणाले, "राज ठाकरे (Raj Thackeray) ईडीच्या चौकशीला सामोरे गेले. चौकशीत काही तथ्य आढळले नसल्यानेच त्यांना क्लीन चिट मिळाली. संजय राऊंतांची चौकशी झाली. काहीतरी आढळल्यानंतरच ते तीन महिने तुरुगांत होते. त्यांच्यात ईडी चौकशीत हा फरक आहे. शेवटी कागद काय बोलतात ते महत्त्वाचे असते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com