Shinde vs Thackeray : पक्षप्रमुखांच्या निवडणुकीबाबत आयोगाने कोणताच निर्णय का दिला नाही?

Shinde vs Thackeray : ३० जानेवारीला पुढील सुनावणी होणार
Shinde and Thackeray
Shinde and Thackeray Sarkarnama

Shinde vs Thackeray : पक्षचिन्ह धनुष्यबाण कुणाचे, शिवसेना कुणाची या विषयावर आज निवडणूक आयोगाकडे सुमारे चार तास सुनावणी झाली. दोन्ही बाजूंकडून युक्तीवाद ऐकूण घेतल्यानंतर लेखी युक्तीवाद सादर करण्यासाठी सोमवारपर्यंतची मुदत देण्यात आली असून ३० जानेवारीला पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे. परिणामी पक्षचिन्ह आणि पक्षासंदर्भातील निकाल किमान दहा दिवस पुढे गेला आहे.

दरम्यान, पक्षप्रमुखपदाची निवडणूक घेण्यासाठी परवानगी द्या, अन्यथा पदाला मुदतवाढ देण्याची मागणी शिवसेनेच्या वकीलांनी आयोगाकडे केली. मात्र, सुनावणी दरम्यान आयोगाने याबाबत कोणताही स्पष्टता दिलेली नाही. त्यामुळे येत्या सोमवारी (ता.२३) पक्षप्रमुखपदाची मुदत संपल्यानंतर नेमके होणार याबाबत शिवसैनिक तसेच पक्षाच्या नेत्यांमध्येही संभ्रम निर्माण होऊ शकतो.

Shinde and Thackeray
Old pension : योजना नाकारण्याची भाजप नेतृत्वाची स्पष्ट भूमिका गाणारांसाठी धोक्याची ठरणार?

आयोगाकडील सुनावणी संपल्यानंतर आजच निकाल हाती येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, दोन्ही बाजूंचा सुमारे चार तास युक्तीवाद ऐकूण घेतल्यानंतर आयोगाने ३० जानेवारीला पुढच्या सुनावणीची तारीख दिली. येत्या सोमवारपर्यंत दोन्ही बाजूंना लेखी म्हणणे सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. आजच्या सुनावणीत कपील सिब्बल, देवदत्त कामत यांनी ठाकरे गटाकडून तर महेश जेठमलानी व निहार ठाकरे यांनी शिंदे गटाकडून बाजू मांडली.

Shinde and Thackeray
Beed : फडणवीसांच्या सभेला मुंडे भगिनी का होत्या गैरहजर? स्वत: पंकजा मुंडेंनी सांगितलं कारण..

सुनावणी सोमवारपर्यंत पुढे गेली असली तरी पक्षप्रमुखपदाबाबत आयोगाने कोणतीच सूचना केलेली नाही. त्यामुळे ज्या विषयात संबंधित न्यायीक संस्थेने कोणताच निर्णय दिलेला नसतो. याचा अर्थ ती स्थिती जैसे थे राहते, असे कायदेतज्ञ सांगत आहेत. त्यामुळे पुढच्या सुनावणीपर्यंत उद्धव ठाकरे हेच पक्षप्रमुख राहतील, असे या तज्ञांनी सांगितले.

शिंदे गटाने पक्षचिन्ह आणि पक्षावर दावा सांगितल्यानंतर हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेले. त्यावर सुनावणी करण्यास सुरवातीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. मात्र, न्यायालयाने सुनावणीस परवानगी दिल्यानंतर आयोगाने सुनावणी सुरू केली. आतापर्यंत तीनवेळा सुनावणी झाली आहे. आज आयोगाकडून निकाल अपेक्षित होता. मात्र, आता पुन्हा ३० जानेवारीपर्यंत निकालाची वाट पाहावी लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com