मलिक,देशमुख आणि आव्हाड नेमके अडचणीत का आले? जयंत पाटलांनी सांगितलं कारण...

Jayant Patil : छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड होत असेल तर महाराष्ट्रात लोकं विरोध करणारच.
Jayant Patil, Nawab Malik Latest News
Jayant Patil, Nawab Malik Latest Newssarkarnama

पुणे : महाविकास आघाडीचे सरकार असताना राष्ट्रवादीचे दोन मंत्री का अडचणीत आले होते? याबाबतचं नेमकं कारण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना आमच्या काही नेत्यांवर दहशतवादाचे आरोप करण्यात आले.

मलिक हे केंद्र सरकारबाबत खूप आक्रमक बोलत होते. तसेच काही तपास यंत्रणांच्या चुकांवर त्यांनी बोट ठेवले होते. त्यामुळेच बदनामीच्या भीतीने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. पण आम्हाला हा त्रास 2024 पर्यंत सहन करावा लागणार. मात्र आम्हाला खात्री आहे की मलिक लवकरच बाहेर येतील. न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास असल्याचं पाटलांनी सांगितलं. त्यांनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत भाष्य केले. (Jayant Patil, Nawab Malik Latest News)

Jayant Patil, Nawab Malik Latest News
'देवेंद्र फडणवीसांना हे सरकार चालवण्यात रस नाही!'

पाटील राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याबाबतच्या प्रश्नावर म्हणाले की, आव्हाडांना मुद्दामहून अडकवण्याचा प्रयत्न या प्रकरणामध्ये होत असल्याचं दिसत आहे. ही घटना मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर घडली. त्यावेळी तिथे मुख्यमंत्री यांच्यासह पोलीस देखील होते. मात्र त्यानंतर काही तासांनी गुन्हा दाखल झाला. पण दबावाला बळी पडून अशा प्रकारचे गुन्हे दाखल करणं योग्य आहे का? याचा पोलिसांनी देखील अभ्यास करणं गरजेचं आहे. विनयभंगांचा गुन्हा यामध्ये बसतो का? याचा विचार पोलिसांनी केला पाहीजे, असं पाटीलांनी म्हटलं आहे.

पाटील पुढे म्हणाले, राष्ट्रवादीकडे गृह खातं असताना कधीही कुणावर जाणीवपूर्वक कारवाई केली नाही. गृहखात्याने कोणाच्या सूचना ऐकायच्या आणि किती ऐकायच्या या मर्यादा पाळल्या पाहीजेत. पण मंत्री पोलिसांवर दबाव आणत असतील तर हे योग्य नाही. मी देखील गृहखात्याची जबाबदारी संभाळलेली आहे. पण माझ्या काळात असं कधी झालं नाही. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये असे प्रकार वाढलेले आहेत, असेही पाटील म्हणाले.

Jayant Patil, Nawab Malik Latest News
'शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात एकही मोठा प्रकल्प राज्याबाहेर गेला नाही ही वस्तुस्थिती'

चित्रपटाचा शो बंद पाडणं योग्य होतं का?

हर हर महादेव चित्रपटाचा शो ज्या प्रकारे बंद पाडला ती पद्धत योग्य होती का? या प्रश्नाचं उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले की, या पद्धतीवर डिबेट होऊ शकतं. मात्र जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड होत असेल तर महाराष्ट्रात लोकं विरोध करणारच. राष्ट्रवादीने विरोध केला नसता तरी कोणीतरी केला असता. ज्या गोष्टी झालेल्या नाहीत त्या दाखवण्याला काही अर्थ नाही. चित्रपटाचा शो बंद पाडणं हे प्रकरण झालं. मात्र त्यानंतर दोन दिवसांनी दुसरं कलम शोधून आव्हाडांना अटक करणं हे किती योग्य आहे?, असा सवाल त्यांनी केला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड झाली. याबाबत त्यांनीच सांगायला हवं होतं की, हा चित्रपट येथे चालणार नाही. पण तसं झालं नाही हे दुर्देव असल्याचे म्हणत पाटलांनी मुख्यमंत्र्यावर देखील निशाणा साधला.

तसेच, मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. यावरून राष्ट्रवादीच्या मत्र्य़ांना लक्ष केलं जातय का? या प्रश्नाचं उत्तर देताना पाटील म्हणाले की, राष्ट्रवादीच या सरकारच्या विरोधात ठामपणे उभा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला टार्गेट करण्याचं काम सरकार करत आहे. शरद पवार हे महाराष्ट्रात काहीही करू शकतात. याची सरकारला भीती असल्यानेच राष्ट्रवादीला टार्गेट केलं जात असल्याचा आरोपही पाटीलांनी केला.

Jayant Patil, Nawab Malik Latest News
'हा विनयभंग असेल तर सत्तार, पाटील, भिडे यांच्यावर गुन्हे का दाखल झाले नाहीत?'

अनिल देशमुखांच्या प्रकरणामध्ये तथ्य नाही...

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख सध्या जेलमध्ये आहेत. त्यांच्याबाबत पाटील म्हणाले की, संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधी केसमध्ये काहीच दम नव्हता. त्यामुळे ते बाहेर आले. तसंच अनिल देशमुखांच्या प्रकरणामध्ये देखील काहीच पुरावे नाहीत. कोणी-कोणाला पैसे दिले नाहीत. पण अ ने सांगितलं ब ला पैसे दिले. ब ने क ला सांगितलं आणि ड ने तक्रर केली. त्याच्यावर अनिल देशमुखांना अटक करण्यात आली. मात्र एखाद्याला एवढ्या दिवस डांबून ठेवणं योग्य नाही. न्यायालयाने देखील आता आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणीही पाटलांनी केली.

जेलमध्ये असणारा प्रत्येक जण बाहेर येण्यासाठी प्रयत्न करत असतो. अनिल देशमुख देखील लवकरच बाहेर येतील, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. दरम्यान, अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी 100 कोटी वसूलीचा आरोप केला होता. त्यामुळे ते सध्या कोठडीत आहे. मात्र त्यांच्यावरील आरोपामध्ये काहीही तथ्य नाही, ते लवकरच बाहेर येतील, असा विश्वास जयंत पाटलांनी (Jayant Patil) व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com