BJP for Sharad Pawar : भाजप नेते शरद पवारांबाबत `सॉफ्ट`; निवडणुकीसह 'हे' आहे खास कारण

BJP-Pawar Politics : तरीही कुठे तरी उणीव राहतेच असल्याची भावना भाजपच्या `थिंक टँक`मध्ये असल्याचे दिसते.
BJP soft for Sharad Pawar :
BJP soft for Sharad Pawar :Sarkarnama

Amravati Politics : भाजप नेते शरद पवारांबाबत `स्वॉफ्ट` का झाले याचे इप्सित त्यांच्याच काही व्यक्तव्यावून दिसते आहे. ऐनकेन प्रकारे आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक उमेदवार भाजपचेच असावेत, यासाठी अटोकाट प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे. यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात शंभर कार्यकर्ते आणि लोकसभेच्या मतदारसंघात सहाशे कार्यकर्ते घरोघरी जाऊन आताच योजनांची माहिती देत आहेत. तरीही कुठे तरी उणीव राहतेच असल्याची भावना भाजपच्या `थिंक टँक`मध्ये असल्याचे दिसते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले विविध निर्णय आणि केंद्र सरकारच्या विकास कामे पाहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे नक्की भाजपसोबत येतील अशी आशा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात आलेल्या विविध सर्वेक्षणाच्या माहितीमुळेच भाजपच्या नेत्यांकडून शरद पवार यांच्याबाबत अशी `सॉफ्ट` विधाने केली जात आहेत आणि त्यांनाही माहिती आहे.

BJP soft for Sharad Pawar :
Donald Trump Surrender : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण; काय आहे नेमकं प्रकरण?

शरद पवारांशिवाय देशात सर्वाधिक ४८ लोकसभेच्या जागा असलेल्या राज्यात आपण उज्वल यश मिळवू शकत नाही. यासाठीच गेल्या काही महिन्यात राजकीय पटलावर मोहरे हलविण्याचे काम सुरु असल्याचे आपणाला पाहायला मिळाले. शरद पवारांनीच त्यांच्या आत्मचरित्रात एक प्रसंग सांगितला आहे. जिथे खुद्द त्यांचे सख्खे मोठे भाऊच निवडणुकीत उभे असताना त्यांनी काँग्रेसच्या मुळ विचारसरणीला अनुसरून त्यांच्या विरोधात प्रचार केला, आणि उमेदवार निवडून आणला. असे असतानाही भाजपला आता वाटत असेल की शरद पावर आपल्या सोबत येतील हे त्यांचे दिवा स्वप्नच म्हणावे लागेल.

नुकतेच चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी तीस हजार कार्यकर्ते सध्या कामाला लागले आहेत. घरोघरी जा न केलेल्या विकास कामांबाबत जनतेत जागृती करीत आहेत. एवढी मोठी यंत्रणा कामाला लागली असतानाही प्रदेशाध्यक्षांना शरद पवार आमच्या सोबत येतील, अशी आशा ठेवावीच लागते आहे. यातच सर्व राजकारण आले.

BJP soft for Sharad Pawar :
Chandrashekhar Bawankule On Sanjay Raut : ठाकरेंचे भरकटलेले 'यान' काँग्रेसच्या धुमकेतूवर आदळून नष्ट होईल ; बावनकुळेंचा राऊतांना चिमटा

सहकारासाठीचा केंद्राचा वेगळा मंत्रालयाचा निर्णय असो, साखर निर्यातीबाबतचा निर्णय असो, अथवा आता कांदा निर्यातीवरील चाळीस टक्के कराच्यावर शरद पवार यांनी सतत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे. व्यक्तिगत नातेसंबंध आणि राजकीय विचारसरणी याबाबत शरद पवार यांनी स्पष्ट रेखा आखून घेतल्याचे आतापर्यंतच्या त्यांच्या राजकारणावरून वाटते. त्यांची ताकद राज्यात किती आहे, आणि त्यांनी गेल्या दोन महिन्यात घेतलेल्या सभांना होणारी तरुण पिढीची गर्दी पाहता, भाजपला त्यांचे डावपेच यशस्वी होण्यात मोठे अडथळे येतील, असे वाटते आहे.

हे जाणूनच भाजपच्या मोठ्या नेत्यांनी गेल्या काही महिन्यांपासून शरद पवार यांच्या बाबत `सॉफ्ट` भूमिका घेतल्याचे दिसते आहे. याचा त्यांनी किती फायदा होईल हे येणारा काळच ठरवेल, हे नक्की.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in