शिवसेना कुणाची?; निवडणूक आयुक्तांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य...

राजकीय पक्षाबाबत आणि त्याच्या चिन्हाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला आधीपासूनच आहे.
Rajiv Kumar
Rajiv Kumar Sarkarnama

मुंबई : सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या पक्षचिन्हासंदर्भात वादावरून निवडणूक आयोगाच्या कामकाजास स्थगिती देण्यास नकार दिल्याने नवा पेच निर्माण झाला. यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून परस्परविरोधी केल्या जाणाऱ्या दाव्याबाबत निवडणूक आयोग काय निर्णय देणार याबाबत उत्सुकता निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांन माध्यमांशी संवाद साधला.

Rajiv Kumar
उद्धव ठाकरेंचा भाजपला धक्का; मुंबईच्या माजी उपमहापौरांच्या मुलाचा शिवसेनेत प्रवेश...

राजीव कुमार म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या गटाला मूळ शिवसेना पक्ष म्हणून किंवा निवडणूक चिन्ह देण्याच्या अर्जावर निर्णय देताना पूर्णपणे पारदर्शक पद्धतीचा अवलंब केला जाईल,'तसेच निवडणूक आयोगाकडे बहुमताच्या नियमाची पारदर्शक प्रक्रिया आहे असून या प्रकरणातही आयोगाकडून ती प्रक्रिया केली जाईल,असे प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Rajiv Kumar
बाळासाहेब ठाकरेंच्या नातवानेच पुरवली मुख्यमंत्री शिंदेंना रसद...

राजकीय पक्षाबाबत आणि त्याच्या चिन्हाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला आधीपासूनच आहे. शिवसेनेच्या प्रकरणातही संघटनेतील बहुमताची चाचपणी करून आम्ही निर्णय घेऊ. गुजरातमध्ये यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राजीव कुमार हे गुजरातमध्ये आले होते. त्यावेळी कुमार यांनी सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com