Shiv Sena : खरी शिवसेना कुणाची? निवडणूक आयोगासमोर आज होणार फैसला

Maharashtra Politics : निवडणूक आयोग काय निर्णय देणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
Uddhav Thackeray-Eknath Shinde Latest News
Uddhav Thackeray-Eknath Shinde Latest NewsSarkarnama

Maharashtra Politics : खरी शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) की एकनाथ शिंदे यांच्यापैकी धनुष्यबाण कुणाला मिळणार? याबाबतची महत्वाची सुनावणी आज (१७ जानेवारी) दुपारी ४ वाजता केंद्रीय निवडणूक आयोगासमोर पार पडणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोग नेमकी काय निर्णय देणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे 40 आमदारांसोबत शिवसेनेतून (ठाकरे गट) बंड करत बाहेर पडले होते. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस याचे सरकार सत्तेत आले. त्यानंतर शिंदे आणि ठाकरे या दोन्ही नेत्यांकडून पक्ष चिन्हावर दावा करण्यात आला. त्यामुळे हा वाद थेट कोर्टात गेला.

Uddhav Thackeray-Eknath Shinde Latest News
Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या 'रोड शो'द्वारे भाजपची ‘वातावरण निर्मिती‘!

त्यानंतर हा वाद सुप्रीम कोर्टाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (Central Election Commission) सोपवला. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना (Shiv Sena) नेमकी कुणाची? याबाबत निवडणूक आयोगासमोर युक्तिवाद सुरू आहे. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल तर शिंदे गटाच्यावतीने अँड. महेश जेठमलानी हे युक्तिवाद करणार आहेत.

Uddhav Thackeray-Eknath Shinde Latest News
Bjp News: '' आता हरायचंच न्हाय!''; भाजपच्या जेपी नड्डांनी निवडणुकांचे रणशिंग फुंकले

आज दोन्ही बाजूचा युक्तीवाद पूर्ण झाल्यास निवडणूक आयोग पुढचा निर्णय देण्याची शक्यता आहे. तर आज दोन्ही बाजूचा युक्तीवाद पूर्ण झाला नाही तर सुनावणीची पुढील तारीख पुन्हा देण्यात येण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray-Eknath Shinde Latest News
Tukaram Munday News : वनवास कधी संपणार; तुकाराम मुंडे अजूनही वेटींगवरच!

दरम्यान, ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटांनी आपआपली कागदपत्र आयोगामध्ये सादर केली आहेत. तसेच दोन्ही बाजूने आपआपली भूमिका देखील मांडलेली आहे. त्यामुळे आता धनुष्यबाण कुणाचे होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com