Sheetal Mhatre : व्हिडिओ व्हायरल प्रकरणाचा मास्टर माईंड कोण? शीतल म्हात्रेंनी स्पष्टच सांगितलं

Mumbai : ठाकरे गटाचे दोन कार्यकर्ते आणि एक काँग्रेस कार्यकर्ता पोलिसांच्या ताब्यात
Shital Mhatre :
Shital Mhatre : Sarkarnama

Sheetal Mhatre : शिवसनेच्या (शिंदे गट) नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक मॉर्फ व्हिडिओ व्हायरल केल्या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये ठाकरे गटाचे दोन कार्यकर्ते तर एक काँग्रेस कार्यकर्ता असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले आहे.

याप्रकरणी शीतल म्हात्रे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर तिघांना अटक करण्यात आली आहे. तसेच हा व्हिडिओ 'मातोश्री'नावाच्या एका पेजवरुन शेअर आणि व्हायरल केल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे.

Shital Mhatre :
Sheetal Mhatre Viral Video : शीतल म्हात्रे यांचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याला अटक!

''व्हिडिओ व्हायरल प्रकरणाचा मास्टर माईंड कोण? याचा शोधही लवकरच घेतला जाईल'', असं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.

म्हात्रे म्हणाल्या, ''आम्ही शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आम्हाला अनेक वेळा वाईट बोललं जातं. अनेक वेळा आमच्यावर आरोप-प्रत्यारोप केले जातात. मात्र, काल एका कार्यक्रमात असताना एक व्हिडिओ मॉर्फ करून व्हायरल करण्यात आला''.

''हा व्हिडिओ 'मातोश्री' या पेजवरून व्हायरल आणि शेअर करण्यात आला. या व्हिडिओला एका तासात जवळपास ३०० पेक्षा जास्त शेअर करण्यात आले होते. एखादी महिला चांगल काम करत असेल, तर तिचे अशा पद्धतीने चारित्र्य हनन केलं जातं. ठाकरे गटाच्या आयटी सेलकडूनच हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला'', असा आरोपही यावेळी त्यांनी केला.

Shital Mhatre :
Nilesh Rane News : नीलेश राणेंविरोधात अश्लील ट्विट करणे पडले महागात, सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल!

''या प्रकरणाचा मास्टर माईंड कोण आहे याचा शोधही लवकरच घेतला जाईल. तर या प्रकरणावर प्रकाश सुर्वेही बोलतील. त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते बोलले नाहीत. पण अशा वेगवेगळ्या अॅग्लने व्हिडिओ काढणं चुकीचं आहे, असं म्हणत व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

''एखाद्या महिलेच्या कामावर बोट ठेवायला जागा नसेल तर चारित्र्यावर शिंतोडे उडविण्यात येतात. याआधीही मला त्रास देण्याचा प्रयत्न झाला होता. पण मी ठाम राहिले. तेव्हा मी उद्धव ठाकरेंना याविषयी सांगितलं होतं''.

''मात्र, त्यांनी ऐकल नाही. कालच्या घटनेनंतर सर्वात आधी मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन केला. त्यांनी सांगितलं, घाबरू नको मी तुझ्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे'', असं म्हात्रेंनी यावेळी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in