दगाबाज आमदारांना फूस लावणारा महाविकास आघाडीतला बडा नेता कोण?

Rajyasabha election 2022| राज्यसभा निवडणुकीतील सहावी जागा जिंकण्यासाठी जीव ओतही शिवसेनेवर पराभवाची नामुष्की ओढवली.
Mahavikas Aghadi| Rajyasabha elelction 2022| Devendra Fadanvis
Mahavikas Aghadi| Rajyasabha elelction 2022| Devendra FadanvisSarkarnama

Rajyasabha Elelction 2022

मुंबई : आधी शिवसेनेशी हातमिळवणी करून भाजप उमदेवाराला मते देऊन ठाकरे सरकारसाठी 'दगाबाज' ठरलेले आमदारा कोण ? यावरून खल सुरू असतानाच फुटीर आमदारांची शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नावेच जाहीर केली. या फुटलेल्या आमदारांना आघाडीतील एका बड्या नेत्याने फूस लावल्याचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिवसेनेच्या (Shivsena) पाठीत खंजीर कोणी खुसला, यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. परंतु, या आमदारांना 'मॅनेज' करण्यात शिवसेना कुठे आणि कशी कमी पडली ? याचे उत्तर शिवसेना नेत्यांकडे नसल्याने फोडाफोडीचे रहस्य वाढले आहे.

राज्यसभा निवडणुकीतील सहावी जागा जिंकण्यासाठी जीव ओतही शिवसेनेवर पराभवाची नामुष्की ओढवली. अपक्ष आमदारांच्या बैठक, त्यांच्या फायली हातावेगळ्या करण्याचा शब्द देण्यापासून सारेकाही करूनही या निवडणुकीत भाजप नेत्यांनी आघाडीच्या गोटातील दहा मते फोडली आणि राज्यसभेच्या तीन जागा जिंकल्या. या निवडणुकीत संजय राऊत यांनी अपेक्षित मतांचा कोटा गाठल्यानंतर, दुसरे उमेदवार संजय पवारही पहाटे तीन वाजता मोजल्या जात असलेल्या पहिल्या पसंतीच्या फेरीत आघाडीवर राहिले. त्याआधीच आघाडीचे दहा मते फोडल्याचे भाजप नेत्यांनी खासगीत सांगितले आणि निकालाचे काटे उलट फिरले.

Mahavikas Aghadi| Rajyasabha elelction 2022| Devendra Fadanvis
राऊत यांनी फुटिरांची नावेच सांगितली: संजय शिंदे, भुयार आणि श्यामसुंदर शिंदे

ऐनवेळी फुटलेले आमदार कोण ? यावरून शिवसेनाच नाही; तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेतेही डोके खाजवत आहेत. अशात आपल्या विजयानंतर आणि संजय पवारांच्या पराभवावर राऊत यांनी विधानभवनात फुटलेल्यांची नावे माहीत असल्याने त्यांनी सांगितले. त्यानंतर शनिवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन राऊत यांनी दगाफटका केलेल्या आमदारांची यादीच दिली. परंतु, सहाव्या जागेवर विजयाची खात्री असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून आघाडीच्या इतर नेत्यांनी रणनीती आखली होती. मुळात, ही रणनीती हाणून पाडण्यामागे आघाडीतील ताकदवान नेता असल्याचे चर्चा पसरली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दगाबाजांना भाजपच्या तंबुत पाठवणारा तो नेता कोण, याकडे लक्ष लागले आहे.

घोडेबाजारात जे काही लोक होते, त्यांची मते आम्हाला मिळाली नाहीत. मात्र, आघाडीतील एका घटक पक्षाचे मत फुटलेले नाही. दगाबाजी केलेले ठाऊक आहेत. तरीही आम्ही व्यापार केला नसून, बहुजन विकास आघाडीचे तीन मते आम्हाला मिळालेली नाहीत. देवेंद्र भुयार यांनी मत दिले नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. मात्र, दरम्यान, राऊत आणि पवार हे विजयी होण्याच्या शक्यतेने विधानभवन परिसरात पहाटे अडीच वाजल्यापासूनच शिवसैनिकांची गर्दी झाली आणि विजयाचे नारे घुमले. त्यानंतरच्या दहाच मिनिटांत म्हणजे, दुसऱ्या फेरीच्या मतांत भाजपचे धनंजय महाडिक खासदार झाल्याचे जाहीर झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com