Amruta Fadnavis News : 'कोण कोण कुठं कुठं डोळा मारतंय..'; अमृता फडणवीसांचा निशाणा कुणावर?

Amruta Fadnavis News : खूप ठिकाणी ते लोक डोळे मारतात!
Amruta Fadnavis News :
Amruta Fadnavis News :Sarkarnama

Amruta Fadnavis News : ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘दिलखुलास दादा’ या मुलाखतीच्या निमित्ताने अजित पवार यांनी आज विविध विषयावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावरही अप्रत्यक्ष भाष्य केले होते. फडणवीस हे रात्री वेश बदलून अनेकांना भेटत असत, याची माहिती त्यांच्या पत्नीला देखील नव्हती, असा उल्लेख अजित पवारांनी (Ajit Pawar) केला होता. आता अजित पवारांवर फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी (Amruta Fadnavis) अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

Amruta Fadnavis News :
Sujay Vikhe On Ram Shinde : राम शिंदेंच्या खासदार होण्याच्या इच्छेवर सुजय विखेंची प्रतिक्रिया, म्हणाले..

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या मैत्रीच्या अनुषंगाने बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या,"ते त्या दोघांना जास्त माहिती आहे. राजकीय नेत्यांची खूप लोकांशी जवळीक असते. खूप ठिकाणी ते लोक डोळे मारतात. मला माहित नाहीये की, कुठे कुठे कोण कोण डोळे मारतं, मला या बद्दल काही कल्पना नाहीये," असे अप्रत्यक्षपणे अमृता फडणवीसांनी टोला लगावला.

Amruta Fadnavis News :
Ram Satpute : अफजलखानाच्या औलादींचा माज वाढतोय, जीतूद्दीन हिंदू धर्माला समजतो काय?; सातपुतेंची आव्हाडांवर जहरी टीका!

मागच्या आठवड्यात अजित पवार भाजपसोबत संधान बांधणार का? अशा चर्चांना उधाण आले होते. स्वत: अजित पवारांनी माध्यमांसमोर येऊन यात काही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. याच अनुषंगाने अमृता फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी कोण कुठे डोळा मारतंय, हे ज्याचं त्यालाच माहिती, असं विधान त्यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com