कोरोनाचा संसर्ग नक्की कोण वाढवतोय? सेना, भाजपचे एकमेकांवर आरोप

पुण्यातील कार्यक्रमात 5 ते 10 हजार लोक जमतात ,तिथे कोरोना होत नाही. भाजपने काही केले तर लगेच कोरोनाला आमंत्रण कसे मिळते?, असा सवाल पाटील यांनी केला.
Who exactly is causing the corona infection? Shivsena and BJP accuse each other
Who exactly is causing the corona infection? Shivsena and BJP accuse each other

डोंबिवली : भाजपाच्या वतीने जन आशिर्वाद यात्रा काढण्यात येत असून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरू आहे. या यात्रेत राजकीय कार्यकर्त्यांची गर्दी उसळत असून ही यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. यावर शिवसेनेच्या रॅलीत कोरोना पसरत नाही का? असा प्रतिसवाल केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केला आहे. Who exactly is causing the corona infection? Shivsena and BJP accuse each other

निवडणुकांचा काळ जवळ आला असून पक्षांकडून काही न काही कार्यक्रम होत असतात. यामध्ये कार्यकर्त्यांची, नागरिकांची गर्दी होताना दिसते, मात्र कोरोना कोण पसरवतो यावरून सेना भाजपाने एकमेकांवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. 
भाजपाच्या वतीने जन आशिर्वाद यात्रा काढली जात आहे. भाजपा खासदारांचे जंगी स्वागत केवळ भाजपा कार्यकर्तेच नाही तर सेना, मनसेच्या पदाधिकाऱ्याकडूनही करण्यात येत आहे. 

याठिकाणी गर्दी होत असून कोरोनाचे नियम पायदळी तुडविले जात आहेत. असे असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा वर निशाणा साधत जन आशिर्वाद यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण असल्याची टीका केली होती. या टिकेला केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांनी कल्याण पश्चिम येथे उत्तर दिले. 

कोरोनाचे सर्व नियम पाळून जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. शिवसेना नेते आणि युवा नेत्यांच्या कार्यक्रमात मास्कही लावलेला नसतो, प्रचंड गर्दी असते. याचा अर्थ शिवसेनेच्या रॅलींमध्ये कोरोना पसरत नाही. पुण्यातील कार्यक्रमात 5 ते 10 हजार लोक जमतात ,तिथे कोरोना होत नाही. भाजपने काही केले तर लगेच कोरोनाला आमंत्रण कसे मिळते?, असा सवाल पाटील यांनी केला.

कोरोना नियम सर्वांना सारखेच : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मात्र, सर्वांना कोरोना नियम सारखे असावे असे सांगितले. राजकारणी व्यक्ती असो की सर्वसामान्य, कोरोनाचे नियम हे सर्वांना सारखे आहेत. आणि ते नियम पाळून सर्व गोष्टी करणे आवश्यक असल्याचे मत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीत व्यक्त केले. 

कुठेही आपल्याकडून कोरोना पसरवला जाणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे. कोरोना नियमांमध्ये कोणतीही विशेष कॅटेगरी नाहीये. मग त्यात लोकप्रतिनिधी असोत की राजकीय नेते किंवा मग आम्ही असू दे. कोरोना नियम मोडले तर आमच्यावरही कारवाई झाली पाहीजे अशी अपेक्षा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com