Sameer Wankhede News : वानखेडे भाजपचे कोण लागतात? आरएसएसच्या मुख्यालयात येऊन ते कोणाला भेटले? : पटोलेंचा सवाल

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपचे अनेक नेते वानखेडे यांचे समर्थन करीत आहेत
Sameer Wankhede-Nana Patole
Sameer Wankhede-Nana PatoleSarkarnama

मुंबई : वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयने कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपचे अनेक नेते वानखेडे यांचे समर्थन करीत आहेत. समीर वानखेडे भाजपचा कोण लागतो? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. (Who did Sameer Wankhede meet at RSS headquarters? : Question by Nana Patole)

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांची भेट घेऊन राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत निवेदन देऊन चर्चा केली. त्यानंतर माध्यमाशी बोलताना पटोले यांनी भाजपला अनेक सवाल केले आहेत.

Sameer Wankhede-Nana Patole
Pune DPC Meeting : भाजप-शिंदे गटाला किती निधी द्यायचा ते तुम्ही ठरवा; पण आमच्याही निधीचे नियोजन करा : अजितदादांसह विरोधी आमदार आक्रमक

पटोले म्हणाले की, वादग्रस्त अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर सीबीआयने कारवाई सुरु केली आहे. त्यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरु आहे. वानखेडे यांनी नामांकित व्यक्तींना ब्लॅकमेल करुन माया गोळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. वानखेडेंची सीबीआय चौकशी सुरु असताना गृहमंत्री फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांसह भाजपचे अनेकजण वानखेडे यांचे समर्थन करत आहेत. वानखेडेंना वाचवण्यासाठी भाजपचे हे लोक का पुढे आलेत? वानखेडे भाजपचा कोण लागतो?, असा सवालही त्यांनी केला.

Sameer Wankhede-Nana Patole
Congress Leader News : गाडीची स्मशानभूमीत पूजा...२०२३ क्रमांक अन्‌ कर्नाटकात सत्ता : काँग्रेसच्या बड्या नेत्याचा संकल्प अखेर पूर्ण

सरकारी सेवेत असलेले समीर वानखेडे नागपूरला जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला कशासाठी भेट देतात? ते कुणाला भेटले आणि कशासाठी भेटले? हे उघड झाले पाहिजे, अशी मागणीही नाना पटोले यांनी या वेळी केली.

Sameer Wankhede-Nana Patole
Sharad Pawar News : पुण्याच्या डीपीसी बैठकीला शरद पवारांची हजेरी : बैठकीत कुठल्याही विषयावर भाष्य नाही

कायदा सुव्यवस्थेबाबत पटोले काय म्हणाले?

राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत पटोले म्हणाले की, राज्यातील सामाजिक एकोप्याला गालबोट लावत छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, शेवगाव, नगर व त्र्यंबकेश्वरमध्ये जाणीवपूर्वक वातावरण बिघडवण्याचे काम केले गेले. राज्यातील वातावरण खराब करुन कायदा सुव्यवस्था बिघडवणे राज्यासाठी चिंताजनक बाब आहे. काही संघटनांचे नेते प्रक्षोभक वक्तव्य करून सामाजिक स्वास्थ बिघडवत आहेत. अशा पद्धतीची भडकाऊ भाषणे व वक्तव्य करणाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत असे असतानाही महाराष्ट्रात मात्र कोर्टाच्या आदेशाचे पालन होताना दिसत नाही. राज्यातील पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करत आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com