Sanjay Raut News: संजय राऊतांना चोर कोण म्हणाले ? काय आहे प्रकरण?

Maratha Kranti Morcha On Sanjay Raut : संजय राऊत यांचा मराठा समाजाशी काहीही संबंध नाही.
Sanjay Raut Latest News
Sanjay Raut Latest NewsSarkarnama

Maratha Kranti Morcha On Sanjay Raut : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या मोर्चाला नॅनो मोर्चा म्हणून डिवचलं होतं. याच फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना ठाकरे गटाचे नेते व खासदार यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक व्हिडीओ टि्वट केला होता. पण तो व्हिडीओ महाविकास आघाडीचा असून मराठा क्रांती मोर्चाचा असल्याचा ठपका फडणवीस यांनी ठेवला होता. यानंतर मराठा क्रांती मोर्चा देखील आक्रमक झाला असून संजय राऊतांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

मराठा क्रांती मोर्चाकडून विरोधात शिवाजी पार्क पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबतची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी दिली आहे. पवार म्हणाले, संजय राऊत यांनी ट्विटवर एक व्हिडीओ टाकला होता. पण तो मराठा समाजाचा विडिओ होता आणि त्यांनी तो हेतूपुरस्सर महाविकास आघाडीचा मोर्चा दाखविण्याचा प्रयत्न केला. संजय राऊत यांचा मराठा समाजाशी काहीही संबंध नाही. ते मराठा नाहीत किंवा मराठा समाजाशी संबंध नाही.

Sanjay Raut Latest News
Devendra fadnavis on Disha Salian Case : आदित्य ठाकरेंची अडचण वाढणार; दिशा सॅलियन आत्महत्याप्रकऱणाची SIT मार्फत चौकशी होणार

यामुळे संजय राऊतांविरोधात आम्ही शिवाजी पार्क पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. त्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील आम्ही मुंबई पोलीस आयुक्ताकडे केली आहे. त्यांनी आम्हाला आश्वासित केले आहे असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

Sanjay Raut Latest News
Chandrakant Khaire : राहुल शेवाळेंची अनेक लफडी, तर बांगर पत्याचा क्लब चालवतो..

संजय राऊत चोर आहेत, त्यांच्यावर 420 कलम अंतर्गत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे कारवाई झाली नाही तर आम्ही कोर्टात जाऊ. आम्ही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूरच्या मराठा पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली आहे. ते मुंबईत आले की आम्ही पुन्हा भेट घेणार आहोत अशी माहितीही पवार यांनी यावेळी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com