भाजपचा वंश कोणता, बावनकुळे की १५२ कुळे? उद्धव ठाकरेंचा सणसणीत टोला

Uddhav Thackery : मुंबई संकटात असते तेव्हा ही गिधाडे कुठे असतात? मुंबई जमीन नाही, आमची मातृभूमी आहे.
Uddhav Thackery
Uddhav ThackerySarkarnama

मुंबई : शिवसेनेत झालेल्या अभूतपूर्व बंडखोरीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात आज मुंबईतील शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा पार पडला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आजच्या भाषणांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. यावेळी ठाकरे यांनी शिंदे गट, भाजप, देवेंद्र फडणवीस, अमित शहा यांच्यावर सडकून टिका केली आहे. आज मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानात गटप्रमुखांच्या मेळाव्यात ठाकरे बोलत होते.

भाजपकडून शिवसेनेवर सातत्याने वंशवादी पक्ष म्हणून टीका करण्यात येत होती. याचा उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेत, भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. "कमळाबाईचा आणि मुंबईचा सबंध काय आहे ? असा सवाल त्यांनी केला. कमळाबाई हा शब्द बाळासाहेबांचा आहे. मुंबईवर हक्क सांगू नका. वंशवाद कसला वंशवाद ? मला माझ्या वंशाचा अभिमान आहे, मुंबईच्या लढ्यात माझे आजोबा होते. पण तुमचा वशं कोणता, बावनकुळे की १५२ कुळे? असा सणसणीत टोला ठाकरे यांनी लगावला.

आमची २५ वर्ष युतीमध्ये सडली. ही सगळी नालायक लोकं आपण पोसली. काही नसताना यांना पदे दिली. मराठी माणसासाठी तुमचा वशं कोणता, बावनकुळे की १५२ कुळे, असा त्यांनी भाजपला टोला लगावला. ७० वर्षानंतर चित्ता आणला. काय काय जाहिराती सुरु होत्या, दार उघडल्यावर चित्ता करतो मॅव, असा चिमटाही ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काढला.

Uddhav Thackery
ठाकरेंचा अनोखा 'दोस्ताना' ; राऊतांसाठी सभेत खुर्ची राखीव!

मुंबई संकटात असते तेव्हा ही गिधाडे कुठे असतात. मुंबई जमीन नाही, ही आमची मातृभूमी आहे. जो आमच्या अंगावर येईल, त्याचा कोथळा बाहेर काढल्या शिवाय राहणार नाही. आईला गिळायला निघालेली ही औलाद आहे. दसरा मेळावा येतोच आहे, तेव्हा बोलणार आहेच, असाही इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com