Nawab Malik News : नवाब मलिकांचं अखेर ठरलं : साहेब की दादा ? ; मलिक म्हणाले, "मी...'

Maharashtra Politics : नवाब मलिक यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
 Nawab Malik News
Nawab Malik News Sarkarnama

Mumbai : तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या गटात जाणार? याबाबत सगळ्यानाच उत्सुकता आहे. याबाबत अनेक तर्क-वितर्क लावण्यात येत असताना नवाब मलिक यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

“मी कोणत्याही गटात जाणार नाही. मी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राहणार आहे”, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याबाबतचे वृत्त दिले आहे. मलिक यांच्या या विधानामुळे ते अजित पवार यांच्या गटात सहभागी होणार नाही, असे त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले आहे.

 Nawab Malik News
Sharad Pawar Beed Sabha : पवारांच्या सभेपूर्वीच मुंडेंना धक्का ; बबन गित्ते हे शरद पवार गटात प्रवेश करणार

नवाब मलिक तुरुंगात गेल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीत फूट पडून दोन गट झाले. जामीन मिळाल्यानंतर नवाब मलिक कोणत्या गटात राहणे पसंत करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मलिक यांच्यावरील आरोपांचे स्वरुप अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे ते अजित पवार गटात आले तर भाजप आणि शिंदे गट कोणती भूमिका घेणार यावरील चर्चांना उधाण आले होते.

शरद पवारांचे कट्टर समर्थक म्हणून मलिकांची ओळख आहे. पण बदलेल्या राजकीय स्थितीत ते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आदी ज्येष्ठ नेत्यांसारखी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांची पाठराखण करण्याचा वेगळा निर्णय घेतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. त्यांच्यावरील आरोपांचे गंभीर स्वरुप पाहता ते सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेऊन स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवून ठेवू शकतात, असेही बोलले जात होते.

 Nawab Malik News
Dharmarao Baba Atram News : पवारांनी ठणकावल्यानंतरही धर्मराव बाबा आत्राम म्हणतात, "शरद पवार हे आमचे गुरू, त्यांचे फोटो लावणारच..

अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर मलिकांची कन्या सना मलिक यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे मलिक यांना लवकरच जामीन मिळेल असा दावा केला जात होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. यामुळे ते राष्ट्रवादीच्या सत्ताधारी गटात जाणार असल्याची चर्चा सुरू होत्या.पण मलिकांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याने या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com