Chhatrapati sambhajiraje : इतकी असंवेदनशीलता कुठून येते? संभाजीराजे राज्य सरकारवर संतापले

Shinde-Fadnavis government : ''शेतकरी जगला तर तुम्ही जगाल...'', असं ट्विट करत संभाजीराजेंनी संताप व्यक्त केला.
Chhatrapati sambhajiraje
Chhatrapati sambhajirajeSarkarnama

Kolhapur News : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्याच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. याच मुद्द्यावरूव विरोधकांनी सरकारला घेरलं आहे.

तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणीही विरोधक करत आहेत. तर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात येत असल्याचे सरकारच्यावतीने सांगण्यात येत आहे. आता याच मुद्यावरून संभाजीराजे छपत्रती सरकारवर संतापले आहेत.

Chhatrapati sambhajiraje
Sharad Pawar News : मायावती, जयललिता यांना बहुमत मिळाले, पवारांना का नाही? शिवतारेंनी डिवचलं

इतकी असंवेदनशीलता कुठून येते? शेतकरी जगला तर तुम्ही जगाल. अशा शब्दात संभाजीराजे छपत्रती यांनी राज्य सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

काय आहे संभाजीराजे यांचे ट्विट?

अवकाळी पाठोपाठ गारपीटीने शेतकऱ्याला ग्रासले आहे. उभे पीक जमीनदोस्त झाले आहे. अशा परिस्थितीत राज्यसरकारने व कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असताना सरकार व कृषीमंत्री साधे धीर देतानाही कुठे दिसत नाहीत. इतकी असंवेदनशीलता कुठून येते? शेतकरी जगला तर तुम्ही जगाल. असे ट्विट संभाजीराजे छपत्रती यांनी केले आहे.

दरम्यान, अवकाळीच्या तडाख्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारच्या मदतीची शेतकऱ्यांना आशा लागली आहे. मात्र, शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in