MPSC News : एमपीएससीचा सावळागोंधळ कधी थांबणार?; 'आम्हाला भुर्दंड का?' विद्यार्थी संतप्त...

Maharashtra Public Service Commission News : पुन्हा चाचणी घेणे कितपत संयुक्तिक ?
Maharashtra Public Service Commission News :
Maharashtra Public Service Commission News : Sarkarnama

Maharashtra Public Service Commission News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा-२०२१ मधील टंकलेखन कौशल्य चाचणी रद्द करण्यात आली आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून लिपिक टंकलेखक व कर सहायक या संवर्गासाठी दिनांक ७ एप्रिल रोजी ही चाचणी घेण्यात आली होती. मात्र ही चाचणी पार पडताना, पण या चाचणीदरम्यान अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या, यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.

यामुळे आता ही चाचणी पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. आता आयोगाने विद्यार्थ्यांची ही मागणी मान्य केली आहे. मात्र आता या परिक्षेत चांगली कामगिरी करणाऱ्या उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Maharashtra Public Service Commission News :
Mla Salgar Meet Nilangekar : कर्नाटकात विजयी झालेल्या आमदाराने निलंगेकरांची भेट घेत मानले आभार..

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यभरातील उमेदवारांची मुंबईच्या केंद्रावर टंकलेखन कौशल्य चाचणी ७ एप्रिल घेतली होती. अनेक उमेदवारांना या चाचणीवेळी तांत्रिक समस्या आल्या, याबाबतच्या तक्रारीही आयोगाकडे केल्या होत्या. यामुळे सोमवारी आयोगच्या वतीने ही चाचणी पुन्हा एकदा राबवली जाणार असे जाहीर करण्यात आले. यामुळे आता ७ एप्रिल रोजी आयोजित टंकलेखन टंकलेखन कौशल्य चाचणीस उपस्थित राहिलेल्या सर्वच पुन्हा एक एकदा चाचणी द्यावी लागणार आहे.

आयोगाची प्रस्तावित टंकलेखन कौशल्य चाचणी ३ एप्रिल २०२३ रोजी प्रसिद्ध झालेल्या पत्रकामध्ये नमूद असलेल्या मानकांनुसार व त्या निकषांनुसारच चाचणी घेतली जाणार आहे. चाचणीच्या संदर्भाने आता सर्व पात्र उमेदवारांना पुन्हा एकदा नव्याने, प्रसिद्ध केल्या जातील. या सुचनांनुसार उमेदवारांना अनिवार्य असतील. ही चाचणी मुंबईच्या केंद्रावर घेतली जाणार आहे. चाचणीचा तारीख व वेळ जाहीर करू, ती विद्यार्थ्यांना कळवले जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले.

Maharashtra Public Service Commission News :
Akola BJP News : अंधारेंच्या नावावर एकमत, पण अग्रवालांच्या नावाला विरोध करणारे ते दोन डॉक्टर कोण?

पुन्हा चाचणी घेणे कितपत संयुक्तिक ?

टंकलेखन कौशल्य चाचणी ही आयोग पुन्हा राबवणार असल्यामुळे आता काही विद्यार्थ्यांनी आक्षेप ही घेतला आहे. चाचणी जर पार पडली आहे, तर पुन्हा ती घेण्याची गरज काय? अशीच जर का आयोगाची भूमिका असेल तर प्रत्येक परिक्षा पुन्हा घेता येणार आहे का? या चाचणीसाठी राज्यातील विविध शहरातून उमेदवारांना मुंबईला यावं लागणार, हे योग्य नाही, असा आक्षेप काही उमेदवारांनी घेत, आम्हाला का याचा भुर्दंड, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in